शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जन्म गुपचूप अन् मृत्यू थेट रस्त्यावर; नवजात अर्भक बसमधून फेकणाऱ्या दोघांवर खुनाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:37 IST

पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटकेत करण्यात आली आहे. 

- विठ्ठल भिसेपाथरी (जि परभणी ): अर्ध्या तासापूर्वीच जन्मलेलं एक गोंडस बाळ सुसाट धावत्या ट्रॅव्हल्स बसमधून फेकून दिलेलं काळसर निळसर कपड्यात गुंडाळलेला जीव. काही मिनिटांतच मृत्युमुखी पडले... ही गोष्ट कुठल्याही काल्पनिक कथेतली नाही, तर पाथरी- परभणी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी  घडलेली वास्तवकथा आहे. 15 जुलैच्या पहाटे, पाथरी-सैलू रस्त्यालगत कॅनॉलच्या पुढे एक अर्भक धावत्या ट्रॅव्हल मधून रस्त्यावर फेकलं गेलं, याच ठिकाणाहून जाणाऱ्या काहींनी पाहिलं तेंव्हा ते मृत होते. प्राथमिक वैद्यकीय अहवालात डोक्यावरील गंभीर मारामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे  हत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

कोण आहेत आरोपी? या प्रकरणात दोन आरोपी ऋतिका मिलिंद ढेरे आणि तिचा तथाकथित पती अल्ताफ मेहनुद्दीन शेख (रा. परभणी) – यांच्यावर सुरुवातीला पाथरी पोलीस ठाण्यात अर्भक विल्हेवाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण वैद्यकीय अहवाल, घटनास्थळ आधारे पोलिसांनी त्वरित भारतीय दंड विधान कलम 103 (1) (खून) अंतर्गत गुन्हा वाढवला. अल्ताफ शेखला पोलिसांनी पहिल्या दिवशी ताब्यात घेऊन चौकशी करून नोटीस वर सोडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं आणि  प्राथमिक मेडिकल रिपोर्टच्या आधारे चौकशीनंतर त्याला अटक केली आहे. पोलिसांनी मृत अर्भकाच्या डीएनए तपासणीसाठी रिपोर्ट पाठवला आहे. अर्भकाच्या मातृत्व-पितृत्वाचा वैज्ञानिक पुरावा लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. मृत अर्भक याची मेडिकल तपासणी आणि डी एन ए तपासणी करण्यात आल्या नंतर ते अंत्यसंस्कारासाठी  मातेच्या ताब्यात देण्यात आलं आहे , ही माता परभणी येथे रुग्णालयात उपचार घेत आहे 

माणुसकीला हादरवणारा प्रकारपाथरीत काल जे घडलं, ते फक्त एका अर्भकाचं नव्हतं... ही घटना पाथरी परिसरात घडली एवढाच या भागाचा संबंध. तथाकथित पती पत्नी हे दोघे मूळ परभणीतील दीड वर्षांपासून ते पुणे चाकण येथे वास्तव करत होते. याच दरम्यान गर्भधारणा झाली. समाजापुढे बाळ कस आणावे म्हणून त्या निर्दयी आईने शेवटच्या क्षणात  बाळ पोटात घेऊन ट्रॅव्हल बसने पुणे ते परभणी प्रवास केला, मात्र बाळ वाटेतच जन्मल. सकाळी पाथरी परिसरात  बसमधून बाळ अमानुषपणे फेकून दिल. मात्र, एका जीवाला जगण्याचा हक्कच मिळू नये, यासाठी त्याचा जन्म गुपचूप, आणि मृत्यू थेट रस्त्यावर? हे त्या मातापित्याच कृत्य निसर्गाला मान्य नव्हत, म्हणूनच लगेच छडा लागत आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेत खुनाचे कलम वाढ झाल्याने तपास आता पोलीस निरीक्षक महेश लांडगे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर