शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! पाथरी बाजारसमिती परिसरातील अनिधिकृत ३२ टिनशेडवर पडणार हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 19:30 IST

बाजार समितीच्या सचिवावरही कारवाई प्रस्तावित; जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून कारवाईचे निर्देश

पाथरी (परभणी) : पाथरी बाजार समिती परिसरातील विवादित जागेवरील बेकायदेशीर उभारलेल्या 32 टिनशेडचे बांधकाम 30 दिवसाच्या आत पाडण्याचे  निर्देश जिल्हा उपनिबंधक यांनी दिले. या 32 दुकानांवर हातोडा पडणार असल्याने व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी सचिवांवर देखील कारवाईची टांगती तलवार आहे.  

बाजार समितीच्या आवारातील मोकळी जागा कापूस खरेदीसाठी 32 व्यापाऱ्यांना देण्याचा निर्णय  तत्कालीन संचालक मंडळाने  दि 29ऑक्टोबर 2020 रोजीच्या ठराव क्र 4 नुसार घेतला. या काळात मोकळ्या जागेवर व्यापाऱ्यांनी पक्के बांधकाम करत टिनशेड उभारले. दरम्यान, जागा बेकायदेशीर वाटप होऊन मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे उद्धव नाईक यांनी 27 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली. जिल्हा विशेष लेखाधिकारी परभणी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशी अवहाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी अधिनियम 1963 चे कलम 40 अंतर्गत कारवाईसाठी नोटीस बजावली. तसेच त्रिस्तरीय समितीचे गठन करण्यात आले होते. या त्रिस्तरीय समितीने 24 जुले  20 23 रोजी जिल्हा उपनिबंधक यांना अहवाल सादर केला. या अहवालानुसार परभणी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी 6 ऑक्टोबर रोजी विवादित जागेवरील अनधिकृपणे केलेले टिनशेडचे बांधकाम तात्काळ पाडण्याचे निर्देश दिले. 30 दिवसांच्या आत कारवाईकरून कार्यपूर्तीचा अहवाल सहायक निबंधक सेलू यांच्या मार्फत सादर करण्याचे आदेशात म्हंटले आहे.

सचिवावर 15 दिवसांत  कारवाई बाजार समितीचे सचिव बी.जे. लिपणे यांच्यावर त्रिस्तरीय समितीने सादर केलेल्या अहवालातील अभिप्रायानुसार जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे . अधिनियम 1963 व त्या खालील नियम 1967 मधील तरतुदीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे सचिव लिपणे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. 

टॅग्स :market yardमार्केट यार्डparabhaniपरभणी