शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: परभणी- परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ७६९ करोड निधीला मंजुरी

By राजन मगरुळकर | Updated: December 7, 2023 16:05 IST

परभणी-परळी या रेल्वे मार्गाचे एकूण अंतर ६४.७१ किलोमीटर एवढे आहे. दररोज या मार्गावर १५ ते २० रेल्वे धावतात.

परभणी : केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात सन २०१०-११ मध्ये मंजुरी मिळालेल्या परभणी-परळी दुहेरीकरण कामाला खऱ्या अर्थाने गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीच्या रेल्वे बोर्डाने ६ डिसेंबरला दक्षिण मध्य रेल्वे विभाग सिकंदराबादच्या जनरल मॅनेजर यांना लेखी पत्राद्वारे या दुहेरीकरण मार्गासाठी एकूण ७६९ करोड ९३ लाख रुपये निधीला मंजुरी दिल्याचे कळविले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या मार्गाचे दुहेरीकरण लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील विविध मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाची कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत मुदखेड ते परभणी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. परभणी जंक्शन येथून पूर्णा, जालना सोबतच परळीकडे जाणारा मार्ग आहे. परभणी-परळी या रेल्वे मार्गाचे एकूण अंतर ६४.७१ किलोमीटर एवढे आहे. दररोज या मार्गावर १५ ते २० रेल्वे धावतात. सोबतच परळी येथील थर्मल पाॅवर स्टेशनसाठी लागणाऱ्या कच्च्या कोळशाची येथे दररोज मालगाडीद्वारे वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर दुहेरीकरण आवश्यक आहे. सदरील मार्गावर विद्युतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ परभणी स्थानक येथून जोडणी प्रक्रिया पुढील काही महिन्यांमध्ये पूर्ण झाल्यानंतर रेल्वे विद्युतीकरणावर धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मात्र, सोबतच गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दुहेरीकरण रखडलेल्या या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न पडला होता. सन २०१०-२०११ च्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पामध्ये परभणी-परळी रेल्वे मार्गाचा समावेश दुहेरीकरण कामासाठी केला होता. त्यानंतर प्रत्यक्षात कामासाठी निधी मिळाला नसल्याने हे काम अपूर्णच राहिले. सदरील काम पूर्ण करण्यासाठी लागणारा आवश्यक निधी मंजूर झाल्याने या मार्गाचे दुहेरीकरण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, सदरील रेल्वे बोर्डाच्या प्राप्त झालेल्या पत्राविषयी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभाग अधिकाऱ्यांनी गुरुवारी अधिकृत दुजोरा दिला.

१० नोव्हेंबरला काढली होती अधिसूचनारेल्वे मंत्रालय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने १० नोव्हेंबरला कामाबाबत अधिसूचना काढली होती. परभणी आणि परळी ६४.७१ किलोमीटर दरम्यान ट्रॅकचे दुहेरीकरण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड व परभणी या तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांना अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले होते. त्यानंतर पंधरा दिवसांतच या कामास फायनान्स डिरेक्टोरेट रेल्वे विभाग यांनीसुद्धा निधी मंजुरीला मान्यता दिल्याने काम जलद गतीने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे बोर्डाने ६ डिसेंबरला दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील जनरल मॅनेजर यांना सदरील पत्र पाठविले. रेल्वे बोर्ड डिरेक्टर दीपक सिंग यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आले आहे.

पिंक बुकमध्ये समावेशया कामाच्या दुहेरीकरणासाठी एकूण ७६९ करोड ९३ लाख एवढी रक्कम आवश्यक आहे. रेल्वे बोर्डाच्या पिंक बुक सन २०२३-२४ मध्ये सदरील कामाचा समावेश केला आहे. त्यामध्ये सिव्हील, एस अँन्ड टी, इलेक्ट्रिकल टीआरडी, इलेक्ट्रिक जी अशा कामाचे वर्गीकरण करून हा एकूण निधी ७६९ करोड ९३ लाख वर्गीकरण केला.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी