लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या २०८ शेतकरी संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकरी, शेत मजुरांच्या समस्यांसाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू कराव्यात, शेतीमालाला किफायतशीर भाव देण्यात यावा, शेतीमालाच्या किंमती पाडणाºया परदेशी शेतमालाची आयात बंद करावी, केंद्र शासनाची अन्यायकारक दुष्काळ संहिता रद्द करावी, जिंतूर, गंगाखेड व पूर्णा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, चारा, पिण्याचे पाणी, हाताला काम सर्वांना रेशन यांच्यासह १३ सुविधा तात्काळ देण्यात याव्यात, दुष्काळग्रस्त शेतकºयांना १०० टक्के पीक विमा अदा करावा, विमा न भरलेल्या शेतकºयांना तितकेच अनुदान देण्यात यावे, मोफत आरोग्य उपचार शासकीय व खाजगी रुग्णालयातून देण्यात यावेत आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठविले.निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, जि.प. सदस्य श्रीनिवास जोगदंड, ज्ञानेश्वर काळे, इर्शाद शेख, प्रसाद गोरे, विष्णू पतंगे, संतोष हरकळ यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.
भाकपचे परभणीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:02 IST