शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत घरकुलाच्या ११०० लाभार्थ्यांच्या स्थळ पाहणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:31 IST

पंचायत समिती  अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पं़स़तील अधिकाऱ्यांनी पावले उचलली असून, मंजूर झालेल्या ११०० लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे़

परभणी : पंचायत समिती  अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पं़स़तील अधिकाऱ्यांनी पावले उचलली असून, मंजूर झालेल्या ११०० लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे़ दोन गावांमधील स्थळ पाहणी पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरात सर्व लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या प्रत्यक्ष बांधकामांना सुरुवात होणार आहे़ 

रमाई आवास योजनेंतर्गत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी राज्य शासनाने रमाई आवास योजना अंमलात आणली़ या योजनेंतर्गत परभणी तालुक्याला २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये ११०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार तालुक्यातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज दाखल केले़ दाखल झालेले अर्ज मंजुरीसाठी पं़स़ प्रशासनाने सामाजिक न्याय विभागाकडे पाठविले़ या अर्जांना सामाजिक न्याय विभागाकडून मंजुरी मिळाली़ त्यामुळे तालुक्यातील ११०० लाभार्थ्यांना वेळेत घरकुल मिळावे, यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ६ एप्रिल रोजी एक पत्रक काढले़ या पत्राद्वारे २०१७-१८ या वर्षातील रमाई आवास  योजनेंतर्गत लाभार्थी निवड झालेल्या पात्र यादीनुसार लाभधारकांच्या घराची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पात्र/अपात्र बाबतचा अहवाल तयार करण्यासाठी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता व संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली़ 

या पथकाला नेमून दिलेल्या गावांमध्ये जाऊन रमाई आवास घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या स्थळाची पाहणी करून लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून पात्र/ अपात्रतेचा अहवाल गटविकास अधिकारी कार्यालयाकडे दाखल करावयाचा आहे़ आतापर्यंत तालुक्यातील भारस्वाडा येथील ३२ व उमरी येथील ९ लाभार्थ्यांच्या स्थळांची पाहणी करून पंचायत समिती प्रशासनाकडे पात्रतेचा अहवाल पाठविला़ त्यानुसार गटविकास अधिकारी कांबळे यांनी भारस्वाडा येथील ३२ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रमाई आवास योजनेच्या घरकुलाचा २५ हजारांचा पहिला हप्ता वर्ग केला आहे़ त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थंड बस्त्यात पडलेल्या रमाई आवास योजनेला पंचायत समिती प्रशसनाने गती दिली आहे़ येत्या काही दिवसांत विस्तार अधिकारी, शाखा अभियंता व ग्रामसेवक यांनी पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करून पात्रतेचा अहवाल पं़स़ प्रशासनाला सादर केल्यास सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे़ 

कागदपत्रातील त्रुटी होणार दूररमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थी निवड झालेल्या पात्र यादीनुसार लाभधारकांच्या घराची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी विस्तार अधिकारी,  शाखा अभियंता व संबंधित गावच्या ग्रामसेवकांचा समावेश आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्या स्थळ पाहणीबरोबरच प्रस्तावातील कागदपत्रांच्या त्रुटीही जागेवरच दूर होणार आहेत़ त्यामुळे येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे़ 

लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याची प्रतीक्षारमाई आवास योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे़ परंतु, २०१७ पर्यंत ज्या लाभार्थ्यांना लाभ दिला आहे़ त्यापैकी बहुतांश लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही़ त्यामुळे उसनवारी करून स्वप्नातील घर पूर्णत्वास नेणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत पाडून दिलेल्या चौथ्या हप्त्यातील रकमेची अजूनही प्रतीक्षा आहे़ त्यामुळे याकडे गटविकास अधिकारी यांनी लक्ष देऊन वंचित लाभार्थ्यांना सहाय्य करावे, तसेच थकीत असलेल्या चौथ्या  हप्त्याची रक्कम देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी  होत आहे़ 

स्तुत्य उपक्रमपंचायत समिती प्रशासनाने लाभार्थ्यांच्या स्थळास भेटी देऊन येणाऱ्या अडचणी सोडून रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांत समाधान आहे़  

टॅग्स :HomeघरParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीparabhaniपरभणी