शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील जम्बो कोविड सेंटरच्या खाटा गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 05:50 IST

पालकमंत्र्यांची घोषणा हवेतच : लोकप्रतिनिधींचे मौन; नागरिकांत नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरातील मनपाच्या कल्याण मंडपम् सभागृहात येत्या आठ दिवसांत ५०० खाटांचे जंबो कोविड सेंटर उभारण्याची पालकमंत्री नवाब मलिक यांनी २२ एप्रिल रोजी केलेली घोषणा हवेतच विरली असून, उद्घाटनाच्या वेळी आणलेल्या खाटा आता गायब झाल्या आहेत. त्यामुळे या केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. 

जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २७ हजार ८१५ रुग्णांची वाढ झाली असून, उपचारांदरम्यान ५६४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरातील परिस्थिती गंभीर असल्याने २२ एप्रिलला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री नवाब मलिक यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा कचेरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परभणी शहरातील मनपाच्या कल्याण मंडपम् येथील सभागृहात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर आठ दिवसांत उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कोविड सेंटरचे उद्घाटनही पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते पार पडले होते. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू असल्याचा अनुभव तिसऱ्याच दिवशी आला होता. नंतरच्या काळात मात्र पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि अचानक उद्घाटनाच्या वेळी आणलेल्या खाटा वाहनात टाकून रातोरात नेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास या कोविड सेंटरला या प्रतिनिधीने भेट देऊन पाहणी केली असता, कल्याण मंडपम् सभागृहात शुकशुकाट दिसून आला. येथील सर्व खाटा गायब होत्या. काही दिवसांपूर्वी पार्टीशयनचे काम करणारे कर्मचारीही गायब होते. 

कल्याण मंडपम् येथील कोविड सेंटरला ऑक्सिजनची लाईन असल्याशिवाय सुरुवात करता येत नाही. दोन दिवसांत ही लाईन टाकून ऑक्सिजनच्या १०० बेडची व्यवस्था येथे केली जाणार आहे. उर्वरित सर्वसाधारण बेड राहणार आहेत. येथे आणलेल्या खाटा व्यवस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या संबंधित कंत्राटदाराला परत केल्या आहेत.-दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

टॅग्स :parbhani-acपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या