शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

शासकीय कामात अडथला निर्माण केल्याप्रकरणी खासदार बंडू जाधव यांना अटक व सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 19:33 IST

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्यासह १५ जणांना आज दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

परभणी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्यासह १५ जणांना आज दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा, प्रलंबित असलेल्या कृषी पंपाच्या ३ हजार वीज जोडण्या देण्यात याव्यात, बिघडलेले विद्युत रोहित्र २४ तासात दुरुस्त करुन द्यावे, थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये यासह अन्य विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांनी गुरुवारी परभणीतीलमहावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयास कुलूप ठोकले होते. तब्बल चार तास चाललेले हे आंदोलन अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते. 

या प्रकरणात महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद कापसे यांच्या फिर्यादीवरुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी खा.जाधव यांच्यासह ७०० ते ८०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी युवासेनेचे जिल्हाप्रमुख अर्जून सामाले यांच्यासह चार जणांना अटक केली होती. त्यानंतर शुक्रवारी संदीप भंडारी, रवि कांबळे, सचिन पवार यांना अटक करण्यात आली. शनिवारी खा. बंडू जाधव यांच्यासह जि.प.सदस्य विष्णू मांडे, बोरी बाजार समितीचे प्रशासक प्रभाकर रोहीणकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे, रामप्रसाद रणेर, गजानन गायकवाड, नितेश देशमुख, शेख हाजी शेख मो.हुसेन, विवेक कलमे, मधुकर निरपणे, सुशिला निसरगण, संतोष मुरकुटे, पंढरीनाथ घुले, संजय सारणीकर, माणिक पोंढे यांना दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली.

त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन  त्यांना परभणी येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने ७ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. तसेच महिन्यातून दोन वेळा कोतवाली पोलीस ठाण्यात हजेरी लावणे व या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत महावितरण कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावेळी न्यायालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपाधीक्षक संजय परदेसी, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण