शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

ऑडिओ क्लिप व्हायरल तरी घेतली लाच; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे रंगेहाथ पकडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 18:10 IST

यासोबतच ५० हजारांची दलाली करणारा क्रीडा अधिकारीही एसीबीच्या गळाला लागला आहे

परभणी : २०२४ मध्ये घेतलेल्या क्रीडा स्पर्धांसह क्रीडा अकॅडमीच्या जागेवर उभारलेल्या स्विमिंग पुलाच्या बांधकामाचे देयक काढण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता सुभाष नावंदे, क्रीडा अधिकारी नानकसिंग महासिंग बस्सी या दोघांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. यातील एक लाख आधीच दिल्यानंतर आज दीड लाखाची लाच स्वीकारताना कार्यालयातच रंगेहाथ पकडले आहे.

यातील तक्रारदाराने २०२४ मध्ये घेतलेल्या क्रीडा स्पर्धांचे ५ लाख, तर क्रीडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पुलाचे ९० लाखांचे देयक नावंदे यांच्या कार्यालयात प्रलंबित होते. ते काढण्यासाठी ३ मार्च २०२५ रोजी तक्रारदार कविता नावंदे व बस्सी यांना भेटले. तेव्हा नावंदे यांनी स्वतःसाठी दोन लाख तर बस्सींसाठी ५० हजार असे अडीच लाख मागितले. देयकात त्रुटी काढण्याच्या भीतीने १३ मार्चला तक्रारदाराने १ लाख नावंदे यांना दिले. मात्र लाचेची उर्वरित रक्कम देण्याची इच्छा नसल्याने २४ मार्चला परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली.

याच दिवशी तक्रारीची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला तर दोघेही भेटले नाही. २५ रोजी नावंदे यांची भेट झाली, तर त्यांनी बस्सी सर येतील, ते करून टाका, असे म्हणत लाच स्वीकारण्याची सहमती दर्शविली. त्यावरून पंचासमक्ष सापळा रचला. २७ रोजी बस्सी यांनी स्वत:साठी ५० हजार व नावंदे यांच्यासाठी १ लाखांची लाच मागितली. ती स्वीकारण्याची तयारी दर्शवून नावंदे यांच्या दालनात नेले. तेथे त्या दोघांनीही लाच स्वीकारली. या दोघांनाही ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगझडतीत आढळली जास्तीची रक्कमआरोपी कविता नावंदे यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्या पर्समध्ये लाचेची रक्कम एक लाख रुपये व अधिकचे सहा हजार तसेच एक मोबाइल आढळला. तर नानकसिंग बस्सीच्या अंगझडतीत लाचेची रक्कम ५० हजार रुपये व त्याव्यतिरिक्त रोख रक्कम १८५० रुपये आणि मोबाइल फोन आढळला.

घरझडतीतही आढळले १ लाख ५ हजारकविता नावंदे यांच्या परभणीस्थित निवासस्थानाची झडती घेतली असता १ लाख ५ हजार रुपये रोख मिळाले आहेत. या झडतीचे छायाचित्रणही केले आहे, तर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील घराची झडती कार्यवाही सुरू आहे. बस्सी यांच्या नांदेड येथील घराची घरझडती सुरू आहे.

कविता नावंदे दोनदा निलंबितकविता नावंदे यांच्याविरोधात अहिल्यानगर येथे २०२० मध्ये मोठे आंदोलन झाल्याने त्यांची बदली झाली होती. छत्रपती संभाजीनगर येथेही त्या एकदा निलंबित झाल्या होत्या, तर त्यापूर्वी एकदा निलंबित झाल्याचे क्रीडा विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यांचा कार्यकाळ बऱ्याच ठिकाणी वादग्रस्तच ठरला आहे.

ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरलमागील आठवड्यात नावंदे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाच क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी ८० हजारांची मागणी केल्याची क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्येही दलाली करणाऱ्या बस्सीचे नाव समोर आले होते.

विधिमंडळातही गाजला मुद्दापरभणीचे आ. राहुल पाटील, पाथरीचे आ.राजेश विटेकर यांनी नावंदे यांच्याविरोधात विधिमंडळातही आवाज उठविला होता. नावंदे यांच्या लाचखोरीमुळे क्रीडाक्षेत्राची पुरती वाट लागल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर नावंदे लाचखोरीत किती बुडाल्या, हे या प्रकरणातूनच समोर आले आहे.

बस्सीवर लाचखोरीचा आधीच एक गुन्हाक्रीडा अधिकारी नानकसिंग महासिंग बस्सी याच्याविरुद्ध २०१७ मधील एका प्रकरणात लाच घेतल्याचा गुन्हा बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. गु. र. नं. ५३४/२०१७ हा गुन्हा दाखल असून, तो न्यायप्रविष्ट आहे.

मोबाइल तपासणारआरोपी नानकसिंग बस्सी आणि कविता नावंदे यांचे मोबाइल ताब्यात घेण्यात आले असून, पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग