शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला; आठ शेळ्यांची शिकार, सात शेळ्या गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2023 18:26 IST

घटनास्थळी वन व पशू वैद्यकीय विभागाच्या पथकाने केली पाहणी; घटनेमुळे झरी शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- अनिल जोशी झरी (जि.परभणी) : शेत आखाड्यावर बांधलेल्या शेळ्यांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. ही घटना शनिवारी सकाळी १० च्या सूमारास परभणी तालुक्यातील झरी शिवारालगत घडली. यामध्ये आठ शेळ्या ठार झाल्या तर सात शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे पशूपालकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील झरी शिवारात दुधना काठावर गट क्रमांक ६३१ मध्ये संतोष ज्ञानोबा शिंदे यांचा शेत आखाडा आहे. या ठिकाणी त्यांनी जवळपास वीस शेळ्या बांधल्या होत्या. मागील काही दिवसापासून विद्युत पुरवठा तांत्रिक दुरुस्ती अभावी बंद असल्याने शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संतोष शिंदे हे पाणी व जेवण आणण्यासाठी गावाकडे गेले. ते परत साडेदहा वाजता शेतामध्ये आले असता त्यांना परिसरात आठ शेळ्या ठार तर काही शेळ्या जखमी झाल्याचे दिसले. त्यांनी हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. तसेच ही घटना वन विभागाला कळवण्यात आली. यात गोठ्यातील पाच शेळ्या दिसून आल्या नाही. यानंतर वन विभागाचे वनपाल के.एस.भंडारी, एन.एस.शेख आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेळ्यांचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्याने झाल्याचे स्पष्ट केले. झरीचे पशुवैद्यकीय अधिकारी अजय धमगुंडे यांनी जखमी शेळ्यांवर उपचार केले.

लांडग्याने हल्ला केल्याचा अंदाजसदरील शेळ्यांवरील हल्ला हा दोन-तीन लांडग्यांनी केला असावा, असा अंदाज वन विभागाचे वनपाल के.एस.भंडारी यांनी व्यक्त केला. त्यात मयत शेळ्यांच्या गळ्याला चावा घेऊन लचके तोडल्याचे दिसून येत आहे. घटनेमुळे झरी शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीforestजंगलparabhaniपरभणी