शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

परभणीतून मदत :पूरग्रस्तांसाठी सरसावले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:52 IST

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तसेच वस्तू स्वरुपातील मदत कोल्हापूर, सांगलीकडे रवाना केली जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तसेच वस्तू स्वरुपातील मदत कोल्हापूर, सांगलीकडे रवाना केली जात आहे़मागील आठवडाभरापासून कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे़ अनेक जण या पुरात अडकल्याने त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे़ पुरामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ अन्न, पाण्याबरोबरच आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाल्याने या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यामधून अनेक सेवाभावी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे़ येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, चतुरंग प्रतिष्ठान परभणी, मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी, शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांसाठी मदत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे़ कांतराव देशमुख यांच्या हस्ते या केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले़ यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे समन्वयक विजय कान्हेकर, अनिल जैन, विलास पानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ या संकलन केंद्रात १५ आॅगस्टपर्यंत मदत संकलित केली जाणार असून, १६ आॅगस्ट रोजी ती पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे़ पूरग्रस्तांसाठी परभणीकर नागरिकांनी मुक्त हस्ते मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले़ प्रा़ सचिन खडके यांनी सूत्रसंचालन केले़ विजय कान्हेकर यांनी प्रास्ताविक केले़ कार्यक्रमास बालासाहेब फुलारी, रुस्तूमराव कदम, श्रीराम गर्जे, गंगाधर गायकवाड, धर्मराज शेजूळ, डॉ़ प्रशांत मेने, प्रा़ बी़पी़ कालवे, एकनाथराव मस्के, के़डी़ जाधव, प्रा़ डॉ़ भगवान पाटील, नितीन बावळे, डॉ़ रमेश भालेराव, विष्णू वैरागड, प्रा़ डॉ़ हनुमंत शेवाळे, प्रा़डॉ़ दत्ता चामले, प्रा़ डॉ़ अविनाश पांचाळ, प्रा़ श्याम पाठक आदींची उपस्थिती होती़शिक्षकांनीही घेतला पुढाकार४पूरग्रस्तांसाठी येथील शिक्षकांनीही मदतीसाठी कंबर कसली आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करीत ही मदत जमा करण्यात आली़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ गेट परिसरात जीवन उपयोगी वस्तू एकत्र करण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे़ बिस्कीट, फरसाण, राजगिरा लाडू, साबण, सॅनिटरी नॅपकीन, धान्य, तेल, कपडे, ब्लँकेट, साड्या, स्वेटर अशा स्वरुपात ही मदत जमा करून त्याचे पॅिक ंग करण्यात आले आहे़४तसेच पैशांच्या स्वरुपात जमा झालेल्या मदतीतून जीवन उपयोगी साहित्य खरेदी केले जाणार आहे़ मंगळवारी सकाळी हे साहित्य कोल्हापूरकडे पाठविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली़ निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, डॉ़ केदार खटींग, डॉ़ मारोती हुलसुरे, रणजित कारेगावकर आदींनी या ठिकाणी भेट देऊन मदत देऊ केली़४या उपक्रमात अजय महाजन, संतोष चव्हाण, देवानंद शेटे, शरद लोहट, प्रा़ डॉ़ जयंत बोबडे, युवराज गरुड, सुनील कदम, गजानन चोपडे, सचिन गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, प्रेमदास राठोड, ज्योती चौंढे, अर्चना पावडे, सविता भाले, श्रेया बोबडे, सविता बोधने, राजश्री बनाळे, उषा मोतीपवळे, संजना लोकरे, जयश्री कदम आदींनी सहभाग नोंदविला़

टॅग्स :parabhaniपरभणीKolhapur Floodकोल्हापूर पूरSangliसांगली