गंगाखेड शहरातील ज्येष्ठ कलावंत बाबुराव केळकर यांच्या अध्यक्षतेखाली २० फेब्रुवारी रोजी तालुक्यातील कलावंतांची बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कलावंत व कला संवर्धन संघाचे मिलिंद साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत कलावंताच्या विविध प्रश्न, अडीअडचणीवर सांगोपांग चर्चा करून तालुक्यातील पारंपरिक लोककलावंत नाट्य, नृत्य, गायक, चित्रकार, वादक, शिल्प कलाकार आदी कलावंताच्या प्रश्नांना निर्भीडपणे मांडणारे विचारपीठ संघटन निर्माण करत कलावंतांची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी नृत्य दिग्दर्शक भूषण गाडे यांची तर सचिवपदी सुशील गायकवाड, कोषाध्यक्ष संजय ऊर्फ आबा साळवे, संघटकपदी हरिभाऊ लिंगायत यांची व सदस्य म्हणून मंगेश मोरताटे, नेमीनाथ मंगले, सचिन बल्लाळ, विश्वनाथ भेंडेकर, त्र्यंबक साबळे, राम लोंढे आदींची एकमताने निवड करण्यात आली. प्रस्ताविक सिद्धार्थ साळवे यांनी तर आभार शिवाजी कांबळे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलावंताची तालुका कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST