शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 14:17 IST

दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्य दलाचे वाहन आणि कंटेनरचा झाला भीषण अपघात

वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील गुंज येथील जवान अंकुश वाहुळकर यांचा २२ मे रोजी दुपारी १ वाजेदरम्यान पश्चिम बंगालमधील बिनागोडी येथून कठिहाल येथे जात असताना भीषण अपघातात मृत्यू झाला. ही बातमी गुंज येथे कळताच गावावर शोककळा पसरली आहे. 

वसमत तालुक्यातील गुंज येथील अंकुश वाहुळकर हे पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत होते. २२ मे रोजी बिनागोडी येथून कठिहालकडे जाणाऱ्या सैन्य दलाच्या वाहनातून ते कर्तव्य बजाविण्यासाठी जात होते. त्यांच्या सोबत इतर सैनिकही होते.  यावेळी गुलाबाह जवळ एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्याचे वाहन आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यात जवान अंकुश वाहुळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गुंज गावासह वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जवान अंकुश वाहुळकर हे डिसेंबर २०२० मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. वीरमरण आलेल्या या जवानावर गुंज येथे २४ मे रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माझा काळजाचा तुकडा काळाने नेला...अंकुशला लहानपणापासून देशाबद्दल प्रेम होते. शाळेत असतानाच मी मिल्ट्रीमध्ये जाणार, देशाची सेवा करणार असे म्हणायचा. गुरुजणांनी शाळेत दिलेला गृहपाठ रोजच्या रोज पूर्ण करायचा. गृहपाठ पूर्ण करत मित्रांना म्हणायचा आपण मोठेपणी सैन्यात जावू, देशाची सेवा करु, मला देशाची सेवा करण्याची खूप इच्छा आहे,असे तो म्हणत असे. माझ्या लेकराची सैन्यात जाण्याची इच्छा देवाने पूर्ण केली. परंतु काळाने माझा काळजाचा तुकडा माझ्यापासून कायमचा हिरावून घेतला आहे. - राणीबाई एकनाथ वाहुळकर (वीर जवान अंकुशची आई)

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानparabhaniपरभणीAccidentअपघातMartyrशहीद