शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

परभणीत साडेतीन हजार घरांचे होणार आॅनलाईन सर्वेक्षण; मालमत्तांच्या महासर्व्हेचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 19:03 IST

आतापर्यंत शहरातील सुमारे ३ हजार ८०० घरांच्या बांधकामांचे आॅनलाईन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे़ 

परभणी : महाराष्ट्र शासन आणि महाआयटी या कंपनीकडून परभणी शहरातील मालमत्तांचे जीओ ग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम (जीआयएस) प्रणालीने सर्वेक्षण केले जात आहे़ आतापर्यंत शहरातील सुमारे ३ हजार ८०० घरांच्या बांधकामांचे आॅनलाईन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे़ 

स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि शहरांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत असलेल्या मालमत्तांचे आॅनलाईन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे़ या सर्वेक्षणासाठी महाआयटी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे़ परभणी शहरात २३ जुलैपासून आॅनलाईन सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, महाआयटी कंपनीचे कर्मचारी घरोघरी फिरून सर्वेक्षण करीत आहेत़ सध्या प्रभाग क्रमांक क मध्ये हे काम सुरू करण्यात आले आहे़ 

शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महाआयटी कंपनीला नागपूर येथून शहराचा आॅनलाईन नकाशा उपलब्ध करून देण्यात आला असून, या नकाशाच्या माध्यमातून प्रत्येक मालमत्तेच्या बांधकामांच्या नोंदी आॅनलाईन घेतल्या जात आहेत़ महाआयटी कंपनीचे कर्मचारी घरोघरी फिरत असून, एकूण मालमत्ता, त्यावर झालेले बांधकाम याच्या नोंदी घेऊन त्या अ‍ॅपद्वारे आॅनलाईन टाकल्या जात आहेत़ या सर्वेक्षणामुळे शहरातील प्रत्यक्ष मालमत्तांची संख्या आणि या मालमत्तांवर झालेल्या प्रत्यक्ष बांधकामाचा अंदाज बांधता येणार आहे़ त्यावरून शहराला द्यावयाच्या पायाभूत सुविधांचाही विचार शासनाच्या वतीने केला जाणार आहे़ 

२३ जुलैपासून शहरात हे काम सुरू करण्यात आले असून, त्यासाठी राहुल वहिवाळ, सचिन भिसे, प्रवीण गायकवाड यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी १६० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे़ परंतु, सध्या केवळ ७० कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे सर्व्हेक्षण केले जात आहे़ 

६८ हजार ५०० मालमत्तापरभणी  शहरात एकूण ६८ हजार ५३३ मालमत्ता आहेत़ त्यात प्रभाग क्रमांक अ मध्ये १० वार्ड असून, या वार्डात १९ हजार ५५१, प्रभाग क्रमांक ब मध्ये १४ वार्ड असून, त्यात २४ हजार ११८ आणि ११ वार्डांचा प्रभाग क्रमांक क मध्ये सर्वाधिक २४ हजार ८६२ मालमत्ता आहेत़ या सर्व मालमत्तांचे जीआयएसद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे़ 

दुसऱ्यांदा शहराचे सर्वेक्षणमहानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक १० वर्षांनी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाते़ या सर्व्हेक्षणात वाढीव मालमत्तांच्या नोंदी घेणे, एकूण मालमत्तांची नोंद घेतली जाते़ परभणी शहरात दोन वर्षापूर्वी या सर्वेक्षणासाठी लातूर येथील एका एजन्सीची नियुक्ती केली होती़ परंतु, ते काम अर्धवट अवस्थेत राहिले़ दोन वर्षापूर्वी महापालिकेकडे केवळ ४५ हजार मालमत्तांचीच नोंद होती़ त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनीच मालमत्तांचे सर्वेक्षण केले तेव्हा या मालमत्ता ६५ हजारांपर्यंत पोहोचल्या़ महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते़ वाढीव मालमत्तांच्या नोंदी झाल्याने महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली़ आता शासनाच्या वतीनेच मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार  असल्याने महानगरपालिकेलाही या सर्वेक्षणाचा लाभ होणार आहे़ 

स्मार्ट डिस्टोमीटरच्या  सहाय्याने नोंदीपरभणी शहरात मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या कर्मचाऱ्यांना स्मार्ट डिस्टोमीटर हे मशीन दिले असून, या मशीनच्या सहाय्याने झालेल्या बांधकामाचे मोजमाप केले जात आहे़ मोजमाप घेतल्यानंतर मोबाईल अ‍ॅपच्या लिंकमध्ये मॅपद्वारे लोकेशन घेऊन या नोंदी जागेवरच फिड केल्या जात आहेत़ त्यामुळे शहराच्या मालमत्तांच्या बांधकामाचा डाटा आॅनलाईन उपलब्ध होणार आहे़ मालमत्ताधारकांनी महाआयटी कंपनीचे आयकार्ड असलेल्या कर्मचाऱ्यांना घरपट्टी, आधारकार्ड दाखवून मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे़ 

राज्य, केंद्रांच्या योजनांचा होणार लाभशहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण झाल्यानंतर शहरामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत़ मालमत्तांच्या नोंदीनुसार या योजनांमधील निधीची तरतूद करणे सोयीचे होणार असल्याने शासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे़ 

घरपट्टीही आॅनलाईनहे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर परभणी शहरातील मालमत्ताधारकांना घरपट्टी देखील आॅनलाईन दिली जाणार आहे़ 

टॅग्स :Parbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाTaxकरparabhaniपरभणी