शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा जन्मस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर पाथरी संस्थांनकडून कृती समितीची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 17:35 IST

वादावर आता पाथरी येथील साईबाबा संस्थाननेसुद्धा कंबर कसली आहे.

ठळक मुद्देविकास आराखड्याला नाही मात्र जन्मभूमी म्हणण्याला विरोध जन्मभूमी बाबतच वाद का

पाथरी : साईबाबांच्या जन्मस्थळावरून शिर्डी येथील नागरिकांकडून सुरू झालेल्या वादावर आता पाथरी येथील साईबाबा संस्थाननेसुद्धा कंबर कसली आहे. गुरुवारी ( दि. १६ ) झालेल्या एका बैठकीत विश्वस्त संजय भुसारी यांनी शिर्डीतील वादाला प्रत्युत्तर देण्यासाठी एका कृती समितीची घोषणा केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना पाथरीमधील साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता. मात्र शिर्डीतून या विकास आराखड्याला नाही मात्र जन्मभूमी म्हणण्याला विरोध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर साई संस्थानचे विश्वस्त आमदार बाबाजानी दुर्राणी, संजय भुसारी, अतुल चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष ढगे ,मुंजाजी भाले पाटील व शहरातील व्यापारी, नागरिक, सर्वपक्षीय नेते यांची एक बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि विश्वस्त संजय भुसारे यांनी साई जन्मभूमी बाबत भूमिका विशद केली. तसेच बैठकीत कृती समितीची घोषणा करण्यात आली. शिर्डी येथील नागरिकांनी केलेल्या विरोधाला कुठल्याही हद्दीमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी कृती समिती असणार आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि  विश्वस्तांचा  समावेश आहे. बैठकीस दादासाहेब टेंगसे , सुभाष कोल्हे , अनिल नखाते ,चक्रधर उगले ,भावना नखाते,  शिवसेनेचे मुंजाभाऊ कोल्हे , अशोक गिराम, एकनाथ शिंदे , उपनगराध्यक्ष हनांन खान , गंगाधर गायकवाड ,  ऍड बी बी तळेकर  यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले. 

जन्मभूमी बाबतच वाद कासाई बाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचे अनेक पुरावे आहेत.  इतके वर्ष जन्मभूमी विकासापासून वंचित राहिली, राष्ट्रपती कोविंद यांच्या भेटीनंतर साई जन्मभूमीच्या विकासाला नवीन मार्ग  सापडला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी मंजूर केला असताना आताच साई बाबा जन्मभूमी बाबत वाद का निर्माण केला जात आहे. शिर्डीचे नागरिक म्हणत असतील साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाला नाही तर कोठे झाला हे सिद्ध करावा ? - आमदार बाबाजानी दुर्राणी

टॅग्स :saibabaसाईबाबाparabhaniपरभणीshirdiशिर्डी