परभणी: वीज वितरण कंपनीतील कर्मचार्यांना कंपनीने बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे कर्मचार्यांत आनंदाचे वातावरण आहे.
कंपनीचे चीफ जनरल मॅनेजर यांनी एक पत्रक काढून २0 ऑक्टोबर रोजी हा बोनस जाहीर केला. ज्या कर्मचार्यांचा बेसिक पे १४ हजारापर्यंत आहे, अशा कर्मचार्यांना १0 हजार रुपये बोनस मिळणार आहे. तर वीज सेवक, विद्युत सहाय्यक, अकाऊंट अस्स्टिंट अशा नव्याने भरती झालेल्या कर्मचार्यांना ४ हजार रुपयापर्यंतचा बोनस दिला जाणार आहे. हा बोनस दिवाळीपूर्वी कर्मचार्यांना वितरित करावा, अशाही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती इंटकचे महाराष्ट्र सचिव वाय.बी.पतंगे व पी.आर. देशमुख यांनी दिली.
दरम्यान, कंपनीने कर्मचार्यांना बोनस जाहीर केल्यामुळे कर्मचार्यांत आनंदाचे वातावरण आहे.
(/प्रतिनिधी)