शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही मुलीच झाल्या, पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले; जीव वाचविण्यासाठी ती रस्त्यावर धावली,पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 19:51 IST

याप्रकरणी कोतवाली ठाण्यात मृत महिलेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून मृत महिलेच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणी : तिन्ही मुली झाल्यामुळे पतीकडून नेहमीच शिवीगाळ, मारहाण करीत पत्नीशी भांडणे व्हायची. यातच गुरुवारी रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना कुंडलिक काळे (३०) हिस पेट्रोल टाकून पेटवून दिले. घटनेनंतर पत्नीला परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारास दाखल केले असता मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शहरातील गंगाखेड रोड अनुसया टॉकीजसमोर राहणाऱ्या एका कुटुंबामध्ये घडली. याप्रकरणी कोतवाली ठाण्यात मृत महिलेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून मृत महिलेच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मैना कुंडलिक काळे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे, तर कुंडलिक उत्तम काळे (३२) असे आरोपी पतीचे नाव आहे. मृत महिलेची बहीण भाग्यश्री काळे (रा. गंगाखेड नाका) यांनी कोतवाली ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी भाग्यश्री आणि मैना काळे या दोघी सख्ख्या बहिणी असून, मैना काळे हिला नंदिनी (सहा), काजल (चार) आणि सोनी काळे (एक वर्ष) अशा तीन मुली आहेत. फिर्यादी आणि मृत या शेजारीच राहतात. मैना हिचा नवरा कुंडलिक हा मैना हिला तिन्ही मुली झाल्यामुळे दररोज शिवीगाळ करून मारहाण तसेच भांडण करीत असे. हे भांडण अनेकदा फिर्यादी बहिणीने सोडविले. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मैना काळे ही ओरडत घराबाहेरील रस्त्यावर आल्याने फिर्यादी यांनी घराबाहेर येऊन पहिले. त्यावेळी आगीने पेटलेल्या अवस्थेत मैना एका दुकानामध्ये शिरल्या व मला वाचवा म्हणून पळत होत्या. यानंतर पती कुंडलिक काळे हा तेथून पळून जाताना दिसून आला. गंभीर जखमी मैना यांना त्वरित सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास डॉक्टरांनी मैना यांना तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर कोतवाली ठाण्यात भाग्यश्री काळे यांनी फिर्याद दिली. मृत महिलेचा पती कुंडलिक काळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस २०२३ कलम १०३ (१) अन्वये जाळून ठार मारल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा रुग्णालय, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरीक्षक संजय ननावरे, उपनिरीक्षक धोत्रे, अंमलदार जंगम, मोहम्मद गौस, मुरकुटे, ताटीकुंडलवार यांनी भेट दिली. आरोपी कुंडलिक काळे यास पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब धोत्रे करीत आहेत.

दुकानांना लागलेली आग घटनेनंतरचउड्डाणपूल परिसरात गंगाखेड नाकाशेजारी दुकाने आणि संबंधित मृत महिलेचे कुटुंबीय राहत असलेले पत्राचे शेड बाजूबाजूला आहे. या पत्राच्या शेडमध्ये घरात महिलेला पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार रात्री समोर आला. सदरील महिला घराबाहेर आली व स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आजूबाजूला पळत होती. त्याचवेळी महिला एका दुकानाजवळ गेल्याने दोन दुकानांना आग लागली. त्यात दुकानातील साहित्य जळाले व महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे प्र. अग्निशमन अधिकारी डी. यू. राठोड यांच्यासह पथकाने आग लागल्याची माहिती मिळताच धाव घेत रात्री एक तासात आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेतील महिलेचा दुर्दैवी अंत झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी