शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पदवीधारकांचा परभणीत मोर्चा; रखडलेली पदभरती तत्काळ करण्याची मागणी

By मारोती जुंबडे | Updated: May 27, 2025 13:30 IST

स्पर्धा मंचच्या वतीने मंगळवारी कृषी विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

परभणी: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदभरती प्रक्रियेविरोधात कृषी पदवीधारकांनी एकत्र येत आज दुपारी १२ वाजता परभणीत जोरदार मोर्चा काढला. स्पर्धा मंचच्या वतीने कृषी विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

परभणी कृषी विद्यापीठात गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली पदभरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. अनेक वर्षांपासून कृषी विद्यापीठांमध्ये कोणतीही नवीन भरती न झाल्यामुळे हजारो पदवीधारक बेरोजगार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, कृषी आचार्य पदवीधारक आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांना कोणतीही पात्रता परीक्षा न घेता थेट पीएच.डी. फेलोशिप देण्यात यावी. तसेच राज्यातील शालेय शिक्षणात कृषी विषय अनिवार्य करावा आणि तो शिकवण्यासाठी केवळ कृषी पदवीधारकांनाच पात्र मानावे, या मागण्यांचाही समावेश होता. 

त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. इंद्र मणि आणि कुलसचिव संतोष वेणीकर यांच्याकडे सादर केले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान, कृषी पदवीधारकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनAgriculture Sectorशेती क्षेत्र