शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तक्रारी ऑनलाइनसह ऑफलाइनही स्वीकारण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:05 IST

मानवत तालुक्यातील वझूर बुद्रुक येथील नुकसानीची केली पाहणी  

मानवत (परभणी): ठाकरे गट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक शिवारातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पाहणी  केली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कृषिमंत्री फक्त बाहेरून बाहेरून  महामार्गाच्या कडेने पाहणी करून नुकसान पाहणी दौरा आटपून घेत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच कृषिमंत्र्यांनी जमिनीवर उतरून नुकसानीची पाहणी करणे आवश्यक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

एक आणि दोन सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक सोयाबीन तूर आधी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  या नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक येथे आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर, युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते यांच्यासह शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

सायंकाळी पाच वाजता  आदित्य ठाकरे यांचे वजुर बुद्रुक या गावात आगमन झाले. पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करत यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेताच्या नुकसानासह  घरातही पाणी घुसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आजच्या दौऱ्यावरून त्यांनी विचारणा केली असता  मुंडे आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषिमंत्र्यांनी  बाहेरून बाहेरून हायवेच्या कडेने शेतांची पाहणी केली. त्यांनी जमिनीवर उतरून पाहणी करावी अशी टीका, आदित्य ठाकरे यांनी केली. 

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कृषी विभागाला  शेतकऱ्यांच्या तक्रारी ऑनलाइनसह ऑफलाइन देखील स्वीकारण्याची मागणी केली. वझुर (बु) नंतर रामेटाकळी शिवारातही ठाकरे यांनी नुकसानग्रस्त कापसाची पाहणी केली. दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीAditya Thackreyआदित्य ठाकरेRainपाऊस