शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

कार्तिकी एकादशीनिमित्त आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वे धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:34 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत.

परभणी : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून दोन विशेष रेल्वे चालविल्या जाणार आहेत. यामध्ये आदिलाबाद-पंढरपूर आणि नांदेड-पंढरपूर या रेल्वेचा समावेश आहे. याबाबत दमरेच्या नांदेड परिचलन विभागाने सोमवारी पत्र जारी केले आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत. यामध्ये आदिलाबाद-पंढरपूर ही रेल्वे तीन नोव्हेंबर रोजी आदिलाबाद येथून दुपारी दोन वाजता सुटणार आहे. ही रेल्वे किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेड येथे सायंकाळी ६:२० वाजता येणार आहे. पूर्णा येथे ७:२०, परभणी येथे ८:०५, गंगाखेड येथे रात्री नऊ वाजता, परळी येथे रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे. पुढे घाटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद मार्गे ही रेल्वे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात पंढरपूर-नांदेड ही विशेष रेल्वे चार नोव्हेंबर रोजी सकाळी १०:४५ वाजता पंढरपूर येथून सुटणार आहे. याच मार्गे ही रेल्वे नांदेड येथे रात्री साडेअकरा वाजता पोहोचणार आहे.

नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वे सोमवारीनांदेड-पंढरपूर ही विशेष रेल्वे ७ नोव्हेंबर रोजी सोमवारी सायंकाळी ६:३५ वाजता नांदेड येथून सुटणार आहे. ही रेल्वे पूर्णा येथे ७:२०, परभणी येथे ८:०५, गंगाखेड येथे रात्री नऊ तर परळी वैजनाथ येथे १०:५० वाजता पोहोचणार आहे. पुढे ही रेल्वे लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे पंढरपूर-आदिलाबाद म्हणून धावणार आहे. ही रेल्वे पंढरपूर येथून आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता निघणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १:४० वाजता ही रेल्वे आदिलाबाद येथे पोहोचणार आहे. या सर्व रेल्वेला २१ डब्बे जोडलेले असतील. ज्यात आठ शयनयान, एक वातानुकूलित, १० सर्वसाधारण, दोन एसएलआर डब्बे असतील.

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणी