शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आंदोलकांची दगडफेक; पोलिसांचा सौम्य लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 15:27 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आज शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलनात शहरातील विविध भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली़ 

परभणी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आज शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र, यात शहरातील विविध भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली़ 

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आज सकाळी १० वाजता मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात बंदचे आवाहन करण्यात आले नव्हते़ परंतु, सकाळपासून शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती़ काही शाळांना सुट्याही देण्यात आल्या होत्या़ शहरातील डॉक्टरलेन भागात दुकाने बंद करण्यावरून दगडफेक झाली़ त्याचे लोण शहरात पसरले़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात अनेक कार्यकर्ते जमले होते़ येथे काही पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू असताना घोषणाबाजी सुरू झाली़ त्यानंतर काही जणांनी वसमत रस्त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको केला़ तर काही जणांनी विसावा कॉर्नर भागात दगडफेक केली़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही दगडफेकीला सुरुवात झाली़ यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला़ त्यानंतर शहरातील दर्गा रोड परिसरात दुकाने बंद करण्याचे आवाहन काही तरुण करीत होते़ यावेळी झालेल्या वादातून तेथेही दगडफेक झालीपोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते नियोजित महात्मा फुले यांचा पुतळा या रस्त्यावरही जमावाने काही दुकानांवर दगडफेक केली़ येथे पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली़ बराच वेळ पोलीस आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते़ परंतु, आंदोलक परत जात नव्हते़ पोलिसांनी नंतर कडक भूमिका घेतल्यानंतर जमाव पांगला़ शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील कार्यकर्त्यांनाही निघून जाण्याचे पोलिसांनी आवाहन केले़ शहरातील उड्डाणपुलावर पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक झाली़ दगडफेकीच्या घटनांमुळे शहरातील वसमत रस्ता, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, पाथरी रोड आदी भागातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती़ ठिक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात  आले़ दुपारी १़३० नंतर परिस्थिती आटोक्यात आली़ पोलीस कर्मचारी अन् आंदोलकही जखमीदगडफेकीच्या घटनेमध्ये शहरातील विविध ठिकाणी जमावाला नियंत्रित करीत असताना झालेल्या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले़ शिवाय जवळपास ८ ते १० आंदोलक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षणParbhani policeपरभणी पोलीसagitationआंदोलन