पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांपूर्वी खून करून फरार झालेला आरोपी सचिन उत्तम तावरे (३२, हडपसर, पुणे) हा पालम तालुक्यातील धानोरा काळे येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. २६ मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुणे येथे प्रकाश देवरे याचा खून करून आरोपी सचिन तावरे हा फरार झाला होता. मागील पाच वर्षांपासून तो पंढरपूर, काशी, मथुरा या ठिकाणी राहून पोलिसांना चकवा देत होता. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार,विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे आदींनी केली.