शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या लग्नाला जाणाऱ्या बहीण-भावजीवर काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 19:56 IST

सहावर्षीय भाचा बचावला, उमरीनजीक अपघात

लक्ष्मण कच्छवेदैठणा (जि.परभणी) : भावाच्या लग्नासाठी निघालेल्या बहीण-भावजीच्या कारला भारस्वाडा टी-पॉइंटजवळ अपघात झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. यात वळणावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार लिंबाच्या झाडाला आदळली. घटनेत पती-पत्नी जागीच ठार झाले, तर सहावर्षीय बालक जखमी झाले आहे. भावाच्या लग्नाला जाणाऱ्या बहीण-भावजीवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

पुणे येथील रहिवासी असलेले संगणक अभियंता आशिष अशोक वैद्य (३८) हे त्यांच्या पत्नी व मुलासोबत कारने नांदेडला मेव्हण्याच्या लग्नासाठी निघाले होते. नांदेड येथेच या पती-पत्नीचे कुटुंब असल्याचे समजते. येत्या ३० मे ला हे मेव्हण्याचे लग्न आहे. या लग्नासाठी ते जात होते. आशिष अशोक वैद्य हे त्यांच्या पत्नी प्रतिभा आशिष वैद्य (३३) व त्यांचा मुलगा सात्विक वैद्य (सहा) हे कार क्रं. (एमएच १२ युएस ७५६४)ने पुणे येथून नांदेडकडे येत असताना, भारस्वाडाच्या पुढे आले असता, एका वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार लिंबाच्या झाडाला आदळली. यात हे दाम्पत्य जागीच ठार झाले. तर मुलगा सात्विक हा जखमी झाला. त्यास परभणीत उपचारासाठी हलविण्यात आले. 

पोलीसांनी केले मदतकार्य घटनास्थळी दैठणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय वळसे, जमादार अतुल ब्रह्मनाथकर, मनोहर पडोळे, युनूस कुरेशी, आशिष मुळे, करवर यांनी भेट देत, जखमीस परभणीत उपचारासाठी पाठविले, तर मृतदेह उत्तरिय तपासासाठी परभणीला पाठविल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात