शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जखमी आई-वडिलांना भेटून निघालेल्या मुलावर काळाचा घाला; अपघातात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 19:40 IST

अपघातात जखमी झालेल्या आई-वडिलांना रुग्णालयात भेटायला आला होता मुलगा 

- सत्यशील धबडगेमानवत (परभणी) : तालुक्यातील रत्नापूर शिवारात मानवत-पाथरी रस्त्यावर 8 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता अज्ञात वाहनाने  धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली. प्रकाश भिमराव मुजमुले आणि आदेश भागवत मुजमुले अशी मृतांची नावे आहेत. मृत आदेश याच्या आई- वडिलांचा रविवारी अपघात झाला होता. त्यांना भेटून परत जात असताना आदेशचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग 61 वर मानवत पाथरी रस्त्यावरून पोहनेर ( ता परळी ) येथील प्रकाश भिमराव, (21)भरत प्रभू  मुजमुले,( वय 25) आदेश भागवत मुजमुले हे आपली दुचाकी क्रमांक एम एच 21 यू 6376 वरून पाथरी कडे जात होते. जायकवाडी वसाहत परिसरात या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले. या तरुणांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयाय दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून प्रकाश भिमराव मुजमुले यास मृत घोषित केले. तर इतर दोघांना अधिक उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे आदेश भागवत मुजमुले यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, जखमी भरत प्रभू मुजमुले याच्यावर उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच पोनि रमेश स्वामी, पोउनि किशोर गावंडे, शेख मुनू नारायण सोळंके, भारत नलावडे, नरेंद्र कांबळे, राजू इंगळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून अपघातास कारणीभूत वाहनाचा तपास सुरु आहे. 

अपघातग्रस्त आईवडिलांना भेटायला आला होता मुलगा आदेश भागवत मुजमुले याच्या आई-वडिलांचा 7 मे रोजी रामेटाकळी शिवारात पाथरी-पोखरनी रस्त्यावर अपघातात झाला होता. यात दोघेही जखमी असून मानवत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना भेटण्यासाठी आदेश इतर दोघांसह मानवतला आला होता. भेटून परत जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी