शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात झाली ६६००० मे़टन खत विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:20 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, कापूस व तूर या पिकांसाठी ६६ हजार ३०० मे़ टन खत खरेदी केले

परभणी : खरीप हंगामात पिकांना खताची मात्रा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ८५ हजार ९३९ मे़ टन खताचा साठा करून ठेवला होता़ त्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, कापूस व तूर या पिकांसाठी ६६ हजार ३०० मे़ टन खत खरेदी केले आहे़ त्यामुळे सध्या रबी हंगामासाठी कृषी विभागाकडे १९ हजार ६३९ मे़ टन खत शिल्लक आहे़ 

जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिकांची दरवर्षी जून महिन्यात पेरणी केली जाते़ या पिकांना लागणाऱ्या औषधी व खतांची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून संबंधित विभागाकडे नोंदविण्यात आली़ त्यानुसार जिल्ह्याला खताचा साठा उपलब्ध होतो़  यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती़ यामध्ये शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीन पिकास प्राधान्य देऊन अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली़ या पिकांना खताची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून खरीप हंगामासाठी १ लाख ५१ हजार १९० मे़ टन खताची मागणी वरिष्ठस्तरावर नोंदविली होती़ 

त्यापैकी ८९ हजार ३६० मे़ टन खत मंजूर झाले़ त्यातून ५० हजार ७६० मे़ टन खत जिल्ह्याला वितरित झाला़ ३१ मार्च २०१८ पर्यंत कृषी विभागाकडे गत रबी हंगामातील ३५ हजार १७९ मे़टन खत उपलब्ध होता़ त्यामुळे कृषी विभागाकडे ८५ हजार ९३९ मे़ टन खताचा साठा झाला़ त्यातील खरीप हंगामात ६६ हजार ३०० मे़ टन खत विक्री झाला़ त्यामुळे कृषी विभागाकडे सध्या रबी हंगामासाठी १९ हजार ६३९ मे़ टन खत उपलब्ध आहे़ विशेष म्हणजे कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार खत जिल्ह्याला उपलब्ध झाल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची कमरता भासली नाही़ 

असा उपलब्ध झाला खतसाठाजिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून वरिष्ठ स्तरावर खताची मागणी नोंदविण्यात आली होती़ त्यानुसार युरिया १८ हजार ९६० मे़टन, डीएपी ८ हजार ८०० मे़टन, एमओपी ३ हजार १०० मे़टन, एनपीके १७ हजार ४०० मे़टन, एसएसपी २ हजार ५०० मे़टन असा एकूण ५० हजार ७६० मे़ टऩ खताचा जिल्ह्याला खरीप हंगामासाठी पुरवठा झाला होता़ 

रबी हंगामाचीही चिंता मिटलीयावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडे ८५ हजार ९३९ मे़टन खताचा साठा उपलब्ध झाला़ त्यातील ६६ हजार ३०० मे़ टन खताची खरीप हंगामात विक्री झाली़  १० सप्टेंबर २०१८ पर्यंत कृषी विभागाकडे १९ हजार ६३९ मे़ टन खत शिल्लक आहे़ तसेच कृषी विभागही रब्बी हंगामासाठी वरिष्ठ स्तरावर जिल्ह्याला खताचा अधिक साठा उपलब्ध व्हावा, यासाठी मागणी नोंदविणार आहे़ त्यामुळे रबी हंगामातही शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र