शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीच्या भेटीला जाणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 13:59 IST

चारठाणा गावाजवळील एका पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

- असगर देशमूखचारठाणा : जिंतुर - जालना महामार्गावर चारठाणा येथील एका पेट्रोल पंपाजवळ दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीच्या भेटीला जाताना हा अपघात घडला आहे.

मयत युवक हा सेलुचा रहिवाशी असून अशोक रावसाहेब अंभुरे असे त्याचे नाव आहे. (एमएच.२० ए.डब्ल्यू १७९९) या दुचाकीवरून अशोक हा सेलुतून जिंतुर तालुक्यातील केर्हाळ येथे बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीस भेटण्यासाठी जात होता. दरम्यान, चारठाणा गावाजवळील एका पेट्रोल पंपाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात मयताच्या डोक्यास, छातीस गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा कयास बांधला जात आहे. अपघातानंतर जवळच असलेल्या सरस्वती हाॅटेलचे मालक दिनकरराव गोरे व मुज्जमिल बशीरखाॅ पठाण हे तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी अपघाताची माहिती चारठाण्याचे सरपंच अनिरुद्ध चव्हाण व चारठाणा ठाण्याला देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, रामकिशन कोंडरे, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, दिनकरराव गोरे, मुज्जमिल पठाण, भारत खाडे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेत सदर युवकास टाकण्यास मदत केली. चारठाणा केंद्राच्या रुग्णवाहिकेतून संबधित युवकास गंभीर अवस्थेत चालक शेख इसाकोद्दीन यांनी तातडीने जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी डाॅ. गजानन काळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. जिंतुरचे सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात,व अलीम शेख यांनीही मदत केल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले.

मोबाईलवर पत्नीचा फोनअपघात घडल्यानंतर मयत युवकाच्या मोबाईलवर अनेकांचे फोन येत होते. दरम्यान, दिनकरराव गोरे यांनी फोन उचलला असता योगायोगाने तो फोन मयत युवकाच्या पत्नीचा होता. या अपघाताची माहिती दिनकर गोरे यांनी मयताच्या पत्नीस दिली असता मयताच्या पत्नीने जिंतुर रुग्णालय जवळ असल्याने सदर इसमास जिंतुरच्या रुग्णालयात हलवावे, असे दिनकर गोरे यांना सांगितले.

मयत होता शाळेच्या वाहनावर चालकमंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास चारठाणा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, रामकिशन कोंडरे, अमृत शिराळे यांनी जिंतुर ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेचा पंचनामा केला असून मयत युवकाचे शवविच्छेदन करुन त्याचे प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, एक दोन वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान, सदर युवक हा माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सेलु येथील पोदार शाळेच्या गाडीवर चालक म्हणुन कार्यरत होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी