शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: महापालिका निवडणुकीपूर्वी वातावरणनिर्मिती करणाऱ्यांची कसोटी; चढाओढीचा किती फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:28 IST

अनेकांनी पक्षांतर केले. अनेक कार्यक्रम घेतले. मात्र, ज्यासाठी हे केले त्या मतदारांना आपल्याच पक्षाला मत देण्यास प्रवृत्त करणे अवघड आहे.

परभणी : महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ज्यांनी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला, त्यांची आगामी काळात कसोटी लागणार आहे. कुणी पक्षीय कार्यक्रमांच्या माध्यमातून तर कुणी पक्षांतराच्या माध्यमातून ही चढाओढ करत होते. त्याची फलश्रुती काय? हे निकालातून दिसणार आहे.

परभणीत विधानसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील मनपाचे राजकीय वातावरण ढवळून काढले. अक्षय देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. मनपाच्या प्रश्नांवरही बैठक लावली. त्यानंतर भाजपने थेट मागच्या वेळी काँग्रेसला सत्तेचे गणित जुळवून देणाऱ्या माजी आ. सुरेश वरपूडकर यांनाच गळाला लावले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला गेला. त्यानंतर महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी बोर्डीकर व वरपूडकरांच्या साथीने विविध कार्यक्रमांत गुंफून ठेवले.

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस कशी मागे राहणार होती. माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशानंतर मुस्लिमबहुल भागात पुन्हा तोंड वर काढत आधीच पक्षात असलेल्या दिग्गजांनी साखरपेरणी सुरू केली होती. माजी खा. तुकाराम रेंगे, माजी आ. सुरेश देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांना हा नवा साथीदार मिळाला. तर नदीम इनामदार, भगवान वाघमारे या अनुभवी चेहऱ्यांना पाठबळ मिळाले.

उद्धवसेनाही विविध स्थानिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विधानसभेला लागलेली जोड कायम राहण्यासाठी काही ना काही प्रयत्न करताना दिसत होती. शिंदेसेना तर फक्त अंतर्गत बंडाळ्या दूर करण्यातच व्यस्त असल्याने वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या भेटीगाठी हाच त्यांचा सामान्यांशी जोडण्याचा एकमेव अजेंडा राहिला. इतर फारसे प्रयत्न दिसले नाहीत. त्यानंतर राष्ट्रवादीतही आ. राजेश विटेकरांच्या उपस्थितीत महानगराध्यक्ष प्रताप देशमुख व अक्षय देशमुख यांच्यातील कुरबुरी समोर येत होत्या. तर भाजपच्या शहरातील काही मंडळींनी ग्रामीण जिल्हाध्यक्षांशी पंगा घेत एकमेकांविरुद्ध तक्रारबाजी सुरू केली. या सर्व प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष फक्त जे पक्षात आहेत त्यांना थोपवून शांत दिसत आहे.

निधी आणण्यास वाव असल्यानेच मनपावर डोळामनपा क्षेत्रात विकास न झाल्याने मोठा निधी आणण्यासाठी वाव आहे. त्यामुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजपच्या सत्तेसाठी प्रयत्नशील आहेत तर आ. राजेश विटेकरांना राष्ट्रवादीची सत्ता अपेक्षित आहे. खा. संजय जाधव व आ. राहुल पाटील उद्धवसेनेच्या सत्तेसाठी प्रयत्नरत आहेत. दुसरीकडे काँग्रेसला पूर्वीप्रमाणे सत्ता राखण्यासाठी झगडावे लागत आहे. एवढेच काय तर गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे यांनीही परभणीत आघाडीचे पॅनल उभे करण्याचा चंग बांधला आहे.

मतांमध्ये परावर्तित कसे करणार?अनेकांनी पक्षांतर केले. अनेक कार्यक्रम घेतले. मात्र, ज्यासाठी हे केले त्या मतदारांना आपल्याच पक्षाला मत देण्यास प्रवृत्त करणे अवघड आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक विकासपुरुषांची दमछाक झाली. शेवटी अर्थकारणाकडे सर्व बाबी झुकल्या. येथेही तेच आव्हान राहणार आहे. ज्यांची आर्थिक स्थिती बिकट त्यांची सत्तेची वाटही तेवढीच बिकट राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Pre-election maneuvers tested; will competition translate to votes?

Web Summary : Parbhani witnesses pre-election political activity with parties vying for power in the upcoming municipal elections. Party switching, events, and internal conflicts create a complex landscape where converting efforts into votes remains a challenge, influenced heavily by financial strength.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६