शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांविरोधात ‘दरिंदा’ शब्दप्रयोग; भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:52 IST

पाथरीत सपकाळ यांच्या विधानाने राजकीय तापमान वाढले, जिंतूर नाका येथे भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवून वक्तव्याचा निषेध

- विठ्ठल भिसे/मोहन बोराडे पाथरी/सेलू : महाराष्ट्रात जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका कोण? तर देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा कोण असेल तर तोही फडणवीसच. त्यांची नार्को टेस्ट करा. मराठा आणि ओबीसीमध्येही त्यांनीच भांडणे लावली. समृद्धी महामार्गामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. देशात सर्वाधिक भ्रष्टाचारही याच राज्यात होतो, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी पाथरीतील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे सेलू येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिंतूर नाका येथे त्यांना काळे झेंडे दाखवून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. 

सपकाळ यांनी पाथरी येथे घेतलेल्या प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. या विधानाने राजकीय तापमान वाढणार आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्या समर्थनार्थ जिल्हा परिषद मैदानावर २१ नोव्हेंबर रोजी दुपारी सभा झाली. सपकाळ म्हणाले, महाराष्ट्रातील जाती-जातींना लढवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. वारेमाप पैसा घेऊन निवडणुकीला उतरले आहेत. आपला स्वाभिमान घ्यायला आलेत. यांना धडा दाखवा. झुकेगा नही साला.. असा बाणा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन मतदारांना केले. जातीयवाद्यांसोबत जायचे की संविधानवाल्यांसोबत जायचे हे ठरवा. काँग्रेसच सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने साथ देण्याचे आवाहनही सपकाळ यांनी केले.

यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार सुरेश देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, नागसेन भेरजे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, नासेर शेख, मुजाहेद खान, सुभाष कोल्हे, तबरेज दुर्राणी, आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ यांना सेलूत दाखवले काळे झेंडेसेलू येथे काँग्रेस आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ हर्षवर्धन सपकाळ सभा घेण्यासाठी शनिवारी सेलू येथे दाखल झाले होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात त्यांनी पाथरीत वादग्रस्त विधान केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेलू येथे सपकाळ आले असता त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, श्याम चाफेकर, भागवत दळवे, शिवहरी शेवाळे, डॉ. गणेश थोरे, काका आवटे, लक्ष्मण बोराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sapakal's derogatory remark against Fadnavis sparks BJP protest.

Web Summary : H Harshvardhan Sapakal accused Fadnavis of corruption and inciting caste divisions. BJP workers protested, displaying black flags in Selu, condemning his remarks made during a Pathri campaign rally.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसparabhaniपरभणीBJPभाजपा