शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'पूल नाही म्हणून जीव गेला!' संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:59 IST

ई-पिक पाहणीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू. ग्रामस्थांचा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप.

- मारोती जुंबडे परभणी : शेतातील पिकांची ई-पिक पाहणी करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना परभणी तालुक्यातील धारणगाव येथे घडली. ही घटना रविवारी घडली असून सोमवारी सकाळी आठ वाजता समसापूर बंधाऱ्याजवळ मृतदेह सापडला. या घटनेमुळे डुकरे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

मृत तरुणाचे नाव गजानन आश्रोबा डुकरे (वय २२, रा. धारणगाव) असे आहे. रविवारी तो आपल्या शेतातील कापूस व सोयाबीन पिकांची ई पिक पाहणी करण्यासाठी निघाला होता. शेतात जाण्यासाठी दुधना नदी पार करावी लागत असल्याने तो पाण्यात उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली, परंतु गजानन सापडला नाही. सोमवारी पहाटे पुन्हा सुरू केलेल्या शोधमोहीमेत सकाळी ८ वाजता समसापूर बंधाऱ्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.या घटनेमुळे प्रशासनावर ग्रामस्थांचा रोष प्रचंड वाढला आहे. आता प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची धडकया दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या धारणगाव ग्रामस्थांनी गजाननचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. "धारणगावातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असूनही दुधना नदीवर पूल उभारण्यात प्रशासन अपयशी ठरले. जर पूल झाला असता तर आज गजाननचा जीव वाचला असता," असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, जोपर्यंत पुलाचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविला जाणार नाही.

बंधाऱ्यामुळे पाणी साचून जीव धोक्यातधारणगावच्या समोर समसापूर गाव आहे. सिंचनासाठी येथे बंधारा बांधण्यात आला असला तरी तो चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर साचते, त्यामुळे नदी ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात येतो. शेतकऱ्यांना पलीकडील शेती करणे कठीण बनले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ठाम मागणी केली आहे की, "हा बंधारा फोडा, अन्यथा दुधना नदीवर पूल उभारा."

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू