शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

हळदीला येताना रस्त्यात अडवले; लग्नाच्या एकदिवस आधी इस्रोच्या वैज्ञानिकावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 11:32 IST

वैज्ञानिकावर हल्ल्याची आठवड्यात दुसरी घटना

परभणी : नवरदेव असलेल्या इस्रोच्या वैज्ञानिकावर हळदीला जात असताना परभणी-वसमत महामार्गावर राहाटी नदी पुलाजवळ चार अज्ञातांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात कारणाने हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पंकज प्रकाश कदम असे जखमी झालेल्या वैज्ञानिकाचे नाव आहे. ते श्रीहरी कोट्टा येथे कार्यरत आहेत. पंकज कदम हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील रहिवासी आहेत. पंकज यांचा विवाह परभणीतील एका मुलीसोबत ठरला होता. या लग्नासाठी नवरदेव पंकज कदम व त्याचे कुटुंबीय हळदीला येत होते. परभणी-वसमत महामार्गावर राहाटी- नांदगाव जवळ सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास त्यांचे वाहन आले असता पुलावर दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या वाहनासमोर दुचाकी आणून उभ्या केल्या. यावेळी पंकज कदम यांनी वाहन थांबविले. काही समजण्याच्या आत हल्लेखोरांनी पंकज यांच्यावर हल्ला केला. त्यांना राॅडने जबर मारहाण केली. या घटनेनंतर दुचाकीवर बसून हल्लेखोर पसार झाले. जखमी पंकज यांना उपचारास परभणीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर परभणीचे अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, तहसीलदार गणेश चव्हाण यांनी दवाखान्यात जाऊन भेट दिली तसेच जखमींची विचारपूस करून चौकशी केली.

इस्त्रोशी संबंध नाही या प्रकरणामध्ये पूर्णा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे व पूर्णा पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. इस्त्रोशी निगडित कोणत्याही प्रकरणातून हा हल्ला झालेला नाही. - यशवंत काळे, अप्पर पोलिस अधीक्षक, परभणी.

नांदेडमध्येही झाली होती अशीच घटनाचार ते पाच दिवसांपूर्वी नांदेड येथे त्यांच्यावर अशाच हल्ला झाला होता. यानंतर पुन्हा हा प्रकार सोमवारी घडला आहे. मात्र, यातील कारण पुढे आले नाही. मंगळवारी उपचारानंतर पंकज कदम हे गावाकडे परतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीisroइस्रो