शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

जिनिंगचे कार्यालय फोडून पावणे नऊ लाखांची रोकड, १३ किलो चांदी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 18:46 IST

Robbery in manwat : कार्यालयात सर्वत्र पायाचे ठसे आणि सामान अस्तव्यस्त पसरलेले कर्मचाऱ्याला आढळून आले.

मानवत (परभणी ): शहरातील वळण रस्त्यावर असलेले राजेंद्र जिनिंग प्रेसिंगचे कार्यालय चोरट्यांनी फोडून रोख 8 लाख 70 हजार व कार्यालयाच्या देवघरात ठेवलेले 14 किलो चांदीचे दागिने असा एकूण 15 लाख 70 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी ( दि. 22 ) पहाटे घडली. या धाडसी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

उद्योजक गिरीश कत्रुवार यांची शहराला लागूनच असलेल्या वळण रस्त्यावर राघवेंद्र जिनिंग आहे. जिनिंग परिसरातच एक इमारत असून या इमारतीत कार्यालय आहे. बुधवारी जिनिंगचे सर्व काम आटपून कार्यालय बंद करण्यात आले होते. आज सकाळी 8:30 वाजता कार्यालयात सर्वत्र पायाचे ठसे आणि सामान अस्तव्यस्त पसरलेले कर्मचाऱ्याला आढळून आले. त्याने याची माहिती गिरीश कत्रुवार यांना दिली. कत्रुवार यांनी लागलीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश स्वामी, सपोनि भरत जाधव पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालयाची तपासणी केली असता कपाटात ठेवलेले रोख आठ लाख 70 हजार रुपये व देवघरातील सात लाख रुपये किमतीच्या 13 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. चोरट्यांनी  सीसीटीव्ही कॅमेरेचे डीव्हीआर ही सोबत नेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि साईनाथ पुयड यांच्या पथकाने घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.  

गस्त वाढविण्याची मागणीराजेंद्र जिनिंग मध्ये झालेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील बुद्ध नगर भागात मागील आठवडाभरापासून चोर येत असल्याची चर्चा आहे. या भीतीने नागरिकांनी रात्र गस्त सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीparabhaniपरभणी