शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ७५ लाखांचा अपहार : ८ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:02 IST

येथील महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या याद्या बदलून ७५ लाख ३७ हजार ७३३ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी प्रशासन अधिकारी ज्योती सुभाष जोशी- कुलकर्णी यांच्यासह ८ जणांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या याद्या बदलून ७५ लाख ३७ हजार ७३३ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी प्रशासन अधिकारी ज्योती सुभाष जोशी- कुलकर्णी यांच्यासह ८ जणांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त तथा शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी साहेबराव शेषराव पवार यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात २५ एप्रिल रोजी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. त्यामध्ये मनपातील शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी ज्योती सुभाष जोशी- कुलकर्णी, लिपीक स.ताजोद्दीन स.युसूफोद्दीन, सुभाष पंडितराव जोशी, फेमस बेकरीचे मालक, सय्यद रफीक शब्बीर (लिपीक ताजोद्दीन यांचे मेहुणे), रेहाना बेगम शब्बीर अली (लिपीक स.ताजोद्दीन यांची पत्नी), मोहम्मद अब्दुल्ला मोहम्मद मकरम, मोहम्मद इलियास मकरम हुसेन या आठ जणांनी २०११ ते जुलै २०१५ या कालावधीत संगणमत केले. शिक्षण विभागातील शिक्षकांच्या वेतनाची रक्कम आरटीजीएस झाल्यानंतर ती शिक्षण निधीत जमा करण्याऐवजी दुसरी बनावट यादी तयार करुन त्यामध्ये नातेवाईकांची व खाजगी व्यक्तींची नावे समाविष्ट करुन आयडीबीआय बॅँकेत खाते उघडले व त्या खात्यातून ७५ लाख ३७ हजार ७३३ रुपयांच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केली. त्यावरुन आठही आरोपींविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल करण्यास मनपाची दिरंगाई४मनपाच्या निधीचा अपहार झाल्याची घटना अनेक महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती; परंतु, या प्रकरणी मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यास चालढकल केली जात होती. यासाठी राजकीय दबावही कारणीभूत असल्याचे समजते. यातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला; परंतु, त्यात अपयश आल्यानंतर शेवटी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. त्यासाठीही तीन दिवस चर्चा करण्यात आली. त्यानंतर चौथ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल करण्यास का दिरंगाई करण्यात आली, याची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस