शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील ७१२ गावांच्या सातबारा झाल्या आॅनलाईन; ८५ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:55 IST

सातबारासाठी शेतकर्‍यांची होणारी परवड आता थांबणार असून, जिल्ह्यातील ८३३  गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ सद्यस्थितीला ८५ टक्के सातबारा आॅनलाईन झाल्या असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकर्‍यांना गावातच त्यांची सातबारा उपलब्ध होणार आहे.

परभणी : सातबारासाठी शेतकर्‍यांची होणारी परवड आता थांबणार असून, जिल्ह्यातील ८३३  गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ सद्यस्थितीला ८५ टक्के सातबारा आॅनलाईन झाल्या असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकर्‍यांना गावातच त्यांची सातबारा उपलब्ध होणार आहे.

राज्य शासनाने महत्त्वाची प्रमाणपत्रे आॅनलाईन देण्याची सुविधा निर्माण केली असून, त्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातही काम सुरू झाले आहे़ ग्रामीण भागात सातबारा हा महत्त्वाचा दाखला असून, प्रत्येक ठिकाणी सातबार्‍याची गरज भासते़ शेतकर्‍यांना त्यांची सातबारा मिळविण्यासाठी तलाठ्याकडे जावे लागते़ अनेक वेळा तलाठी उपलब्ध होत नाहीत़ परिणामी कामे खोळंबतात़ ही गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाने सर्व सातबारा आॅनलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

या निर्णयानुसार मे २०१६ पासून जिल्ह्यामध्ये सातबारा आॅनलाईन करण्याच्या कामास सुरुवात झाली़ गावा-गावात चावडी वाचन करून सातबारांमधील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या़ दुरुस्त झालेल्या या सातबारा संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे़ जिल्ह्यामध्ये ८३३ गावे असून, या गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांची सातबारासाठी होणारी धावपळ आता थांबणार आहे़ परभणी तालुक्यात १३०  गावांपैकी ९८ गावांमधील सातबारा आॅनलाईन उपलब्ध झाल्या आहेत़ जिंतूर तालुक्यातील १६८ पैकी १३८, सेलू तालुक्यातील ९५ पैकी ९५, गंगाखेड तालुक्यातील १०५ पैकी ६३, पूर्णा तालुक्यातील ९४ पैकी ७८, पालम ८० पैकी ७९, पाथरी ५६ पैकी ५६, मानवत ५३ पैकी ५३ आणि सोनपेठ तालुक्यातील ५२ गावांपैकी सर्वच्या सर्व गावांच्या सातबारा आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

डिजीटल स्वाक्षरीसह मिळणार सातबाराजिल्हा प्रशासनाने सातबारा आॅनलाईनचे काम सुरू केले आहे़ आॅनलाईन सातबारा काढल्यानंतर ही सातबारा नायब तहसीलदारांच्या डिजीटल स्वाक्षरीसह मिळणार आहे़ त्यामुळे गावात बसून काढलेली सातबारा ही शासकीय कामकाजासाठी वापरता येणे शक्य होणार आहे़ या सुविधेमुळे शेतकर्‍यांची धावपळ थांबणार आहे़ त्यामुळे महा-ई-सेवा केंद्र, इंटरनेट सेवा केंद्र आणि अँड्रॉईड मोबाईलवरूनही सातबारा काढता येणार आहे. 

येथे मिळाणार आॅनलाईन सातबाराmahabhulekh.gov.in या संकेतस्थळावर प्रत्येक गावातील सातबारा आॅनलाईन उपलब्ध झाल्या आहेत़ 

आॅनलाईन सातबाराचे तालुकानिहाय कामतालुका       टक्केवारीपरभणी      ७५.३८जिंतूर         ८२.१४सेलू            १००गंगाखेड     ६०पूर्णा          ८२.९८पालम       ९८.७५पाथरी       १००मानवत    १०० सोनपेठ    १००एकूण      ८५.४७

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी