स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, पोलीस उपनिरीक्षक पुयड, हनुमंत गायकवाड, तुपसुंदरे, सय्यद मोबीन, शेख अजहर, किशोर चव्हाण, संतोष सानप, संजय घुगे, पिराजी निळे हे २० जून रोजी सकाळी गस्त घालत असताना वाघाळा फाटा येथे आले. यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विलास उत्तम पवार (वय १९, रा.बिहारी कॉलनी, मानवत) व भाऊसाहेब भगवान पवार (वय १८, रा. बिहारी कॉलनी, मानवत) हे दुचाकीवर मानवत शहराकडे जात असताना आढळून आले. यातील एक जण पोलिसांना पाहून हातातील पिशवी सोडून पळून गेला. यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून पिशवीची तपासणी केली. यामध्ये ६१ हजार ६४० रुपयांचा गुटखा व पानमसाला आढळून आला. पोलिसांनी गुटखा जप्त करून मानवत पोलीस स्टेशन येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीवरील दोघांकडून ६१ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST