जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. असे असले तरी दररोज रुग्णांची नोंद होतच असल्याने नागरिकांना अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. गुरुवारी आरोग्य विभागाला ४०८ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २९४ नागरिकांचे अहवाल आरटीपीसीआरचे आहेत. त्यात ५ जण पॉझिटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे रॅपिड किटने केलेल्या तपासणीत ११४ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही. जिल्ह्यात एकूण ८ हजार ३९ रुग्णसंख्या झाली आहे. त्यातील ७ हजार ६५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३१७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये १६, खासगी रुग्णालयात ६ आणि होम आयसोलेशनमध्ये ४७ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात ५ नवे रुग्ण; ८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST