लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ३ ड व प्रभाग क्रमांक ११ अ येथील दोन नगरसेवकांच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकींतर्गत मंगळवारपर्यंत ५ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाले आहेत़परभणी शहरातील प्रभाग क्रमांक ३ ड, प्रभाग क्रमांक ११ अ येथील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे़ या अंतर्गत ३० मे ते ६ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे़ तर ७ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून, १० जून रोजी अर्ज मागे घेता येणार आहे़ ११ जून रोजी अंतीम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून, २३ जून रोजी मतदान होणार आहे़ या अनुषंगाने ४ जूनपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एकूण ५ अर्ज दाखल झाले आहेत़ त्यामध्ये प्रभाग क्रमांक ३ ड मधून कुरेशी रज्जाक रहेमान, मो़ परवेज मो़ उस्मान, खैसर मोहम्मद गुलाब महेमुद या तीन जणांचे तर प्रभाग क्रमांक ११ अ मधून म़ जावेद कादर म़ अब्दुल कादर यांचे दोन अर्ज दाखल झाले आहेत़
पोटनिवडणुकीत ५ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:00 IST