शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भूविकास बँकेच्या सभासदांकडे २२ वर्षांपासून ४३ कोटींची वसुली थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:39 IST

भूविकास बँकेच्या माध्यमातून सातबारावर बोजा टाकून कर्ज पुरवठा केला जात होता.

ठळक मुद्दे१९९८ पासून कर्जवाटप बंदवसुलीसाठी आता ओटीएस योजना

परभणी : जिल्ह्यातील भूविकास बँकांच्या थकबाकीदार सभासदांकडील कर्जाचा डोंगर ४३ कोटींवर पोहचला असून, तब्बल २२ वर्षांपासून थकबाकी असल्याने आता शासनाने ओटीएस योजना सुरू केली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भूविकास बँकेच्या माध्यमातून सातबारावर बोजा टाकून कर्ज पुरवठा केला जात होता. शेतकऱ्यांसाठी भूविकास बँक पैसा उपलब्ध करून देणारी बँक ठरली होती. मात्र बँकेकडील कर्जाचा डोंगर वाढत गेला. साधारणत: ४३ कोटी रुपयांचे कर्ज थकले असून, या कर्जाच्या वसुलीसाठी सहकार विभागाने आता एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदार सभासदांकडील १ एप्रिल २००४ रोजी शिल्लक असलेली मुद्दल आणि त्यावर केवळ ६ टक्के सरळ व्याजाने कर्ज भरणा करून खाते बंद करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. योजनेंतर्गत आतापर्यंत २ हजार १०४ सभासदांनी ७ कोटी ३५ लाख रुपयांच्या कर्जाचा भरणा केला आहे. यात शेतकऱ्यांना शासनाकडून १३ कोटी ७० लाख रुपयांची व्याजाची सवलत देण्यात आली आहे. 

सध्या  १ हजार ९०० सभासद थकबाकीदार असून, योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या सभासदांनी एक रकमी कर्जपरत फेड केल्यास त्यांचा फायदा होणार आहे. परभणी येथील बँकेच्या मुख्य शाखेत शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक एम.बी. सुरवसे यांनी केले आहे. आतापर्यंत थकलेल्या या कर्जाचा बोजा या योजनेत कितपत कमी होतो? हे ३१ मार्च २०२१ नंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी ही बँक बंद असतानाही सभासदांकडे मात्र बँकेकडून घेतलेली थकबाकी वसूल करण्याचे काम सहकार विभागाकडून सुरू आहे. 

१९९८ पासून कर्जवाटप बंदभूविकास बँक बंद झाली असून, १९९८ पासून बँकेने कर्ज वाटपच बंद केले होते. त्यामुळे जे थकबाकीदार शेतकरी आहेत ते सर्व १९९८ पूर्वीचे आहेत.  विशेष म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये काही जण १९७० पासून थकाबीदार असल्याची माहिती प्राप्त झाली. जिल्ह्यामध्ये या बँकेच्या ९ शाखा होत्या. या सर्व शाखा आता बंद करण्यात आल्या असून, परभणी येथील मुख्य कार्यालयात ९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत वसुलीचे प्रयत्न होत आहेत. इलेक्ट्रीक मोटार, नवीन विहीर, पाईपलाईन, ट्रॅक्टर खरेदी, दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालन अशा विविध सुविधांसाठी भूविकास बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. राज्य शासनाने पीक कर्जासाठीची कर्जमाफी दिली असली तरी भूविकास बँकेच्या कर्जांना अद्यापपर्यंत माफी दिली नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढत आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँकfundsनिधी