शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पारदर्शक तपासणीच्या दुर्लक्षामुळे पालममध्ये ३४ लाखाचा धान्य घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 13:57 IST

तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़ 

परभणी : सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़ 

पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाखांचा घोटाळा झाल्याची बाब १० जानेवारी रोजी उघडकीस आली होती़ या संदर्भातील वृत्त ११ जानेवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी गोदामपाल एस़एम़ कांबळे यांना निलंबित केले आहे; परंतु, येथील गोदाम तपासणीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पालमचे पुरवठा निरीक्षक तथा प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यानुसार कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी खुलासा सादर केला आहे़ या खुलाशात त्यांनी स्वत:चीच बाजू मांडल्याचे समजते़ त्यामुळे त्यांचा खुलासा जिल्हाधिकारी कितपत स्वीकारणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ मुळातच पालम येथील गोदामाची नियमित तपासणी होणे आवश्यक होते़ परंतु, ती झाली नाही.

जून २०१७ पासून गोदामपाल कांबळे यांच्याकडे पदभार होता़ त्यानंतरच गेल्या सहा महिन्यांमध्ये धान्य अपहाराचा प्रकार झाल्याचे समजते़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या गोदामाची तपासणी केली व पारदर्शकता बाळगली नाही, असे सर्व अधिकारी या प्रकरणात दोषी आढळत आहेत; परंतु, त्यांच्यावरील दोषारोप प्रशासनालाच सिद्ध करावा लागणार आहे़ केवळ एका कर्मचाऱ्यावर कार्यवाही करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून होऊ शकतो. तशी भीतीही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे़ आतापर्यंत उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यात कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांवरही कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु, तशी कार्यवाही झालेली नाही. 

मुंबईच्या पथकाने ओढले ताशेरेपरभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्य घोटाळा दोन वर्षापूर्वी मुंबईच्या पथकानेच उघडकीस आणला होता़ या पथकाची नियमितपणे गोदाम तपासणी होत असते़ त्या अनुषंगाने २५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत या पथकाने जिल्ह्यातील १० गोदामांची तपासणी केली़ सर्वात शेवटी या पथकाने पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची तपासणी केली़ त्यानंतर तयार केलेल्या अहवालात पथकाने गोदामाची सखोल आणि पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच घोटाळा घडल्याचे नमूद केले आहे़

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसparabhaniपरभणी