जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सोमवार नंतर मंगळवारी किमतीत वाढ झाली. सोमवारी २८ रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी त्यात तिनने भर पडली. त्यामध्ये परभणी शहरातील १८, सेलूतील ३, जिंतूर मधील २, मानवतमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील ४, औरंगाबाद जिल्ह्यातील २ आणि पुणे येथील एका रुग्णाचीही परभणीत नोंद घेण्यात आली आहे. मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका पुरुषाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ४३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ६०७ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील ८ हजार १३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सद्यस्थितीत १४१ रुग्ण आरोग्य संस्थामध्ये उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात ३१ रुग्णांची नोंद; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST