शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून तरुणाचे ३ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:17 IST

नातेवाईकांकडे जुन्या घरात सोने सापडले आहे. तू पैश्याची व्यवस्था केलीस तर कमी भावात मिळेल असे आमिष दिले

ठळक मुद्देखोटी सोन्याची नाणी दाखवून केली पैश्यांची मागणीनकार देताच मारहाण करून पैसे घेऊन दोघे पसार

सोनपेठ :  तालुक्यातील शिर्शी येथे हिंगोली येथील एका व्यक्तीला स्वस्तात सोने देतो म्हणून बोलावून त्याच्या जवळील तीन लाख रुपये लुटल्याची घटना रविवारी ( दि. २३ ) घडली.

हिंगोली येथील आकाश रतनलाल कुरील ( २५ ) याची घाटकोपर येथील संतोष सोबत परभणी येथे ओळख झाली. तेव्हापासून आकाश व संतोष एकमेकाच्या संपर्कात होते. एक महिन्यापूर्वी संतोषाने सोनपेठ येथील माझ्या नातेवाईकांकडे जुन्या घरात सोने सापडले आहे. तू पैश्याची व्यवस्था केलीस तर कमी भावात मिळेल असे सांगितले. त्यानंतर तीन लाख रुपये घेऊन आकाश व त्याचा भाऊ रविवारी सोनपेठ येथे आले. संतोषने आकाशला शिरसी गावातील नदीच्या पुलावर ये असे सांगितले. तेथे थांबल्यानंतर दुचाकीवरील दोघांनी, तुम्हाला संतोषने पाठवले आहे का असे विचारत आमच्या पाठीमागे या असे सांगितले.

काही अंतरावर थांबल्यास त्यांनी आकाशला पैसे आणले आहेत का असे विचारले. आकाशने पैशाची बॅग दाखवताच त्यांनी काही सोनेरी नाणी दाखवली. आकाशने नाणी हातात घेऊन पाहिली असता ती खोटी असल्याची त्याला कळले. यामुळे आकाशने सोने घेण्यास नकार दिला असता त्यांनी दोघा भावांना मारहाण करत पैसे लुटून नेले. या प्रकरणी आकाश कुरीलच्या फिर्यादीवरून संतोष व इतर दोघांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक गजानन भातलवंडे हे करत आहेत.

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी