परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कायम आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालय, आयटीआय व जिल्हा परिषद रुग्णालय या तीन शासकीय रुग्णालयात २२ जणांचा तर तीन खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६ पुरुष, ९ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ३ हजार ६२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ९४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी ५३२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ९७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील २२ हजार ३२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ७५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये सद्य:स्थितीत ६ हजार ८९४ रुग्ण उपचार घेत आहेत.
परभणी जिल्ह्यात २५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST