परभणी : जिल्ह्यात शुक्रवारी २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ९४३ बाधितांची नव्याने नोंद झाली आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कायम आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालय, आयटीआय व जिल्हा परिषद रुग्णालय या तीन शासकीय रुग्णालयांत २२ जणांचा तर तीन खासगी रुग्णालयांत तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६ पुरुष व ९ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ३ हजार ६२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ९४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी ५३२ जणांनी कोरेानावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ९७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील २२ हजार ३२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ७५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये सद्यस्थितीत ६ हजार ८९४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात २१८, आयटीआयमध्ये १५५, अक्षदा मंगल कार्यालयात १५३, जिल्हा परिषद कोविड केअर सेंटरमध्ये २९७ तर गृह अलगीकरणामध्ये ५ हजार ३३६ जण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण हे खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.