शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मानवत तालुक्यात २१०० शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:45 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार अनुदान जाहीर केले होते.

ठळक मुद्देसात महिन्यांचा कालावधी उलटूनही मिळेना रक्कम१० हजार रुपयांपर्यंत मिळणार अनुदान

मानवत (परभणी ) :  तूर विक्री करण्यासाठी तालुक्यातील ३१५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यामधील केवळ ८४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या मात्र तूर विक्री करता न आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केले; परंतु, हे अनुदान प्रत्यक्षात कधी मिळणार याची २१९७ शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र सात  महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर ही शेतकऱ्यांना मदत देण्याचा सोयीस्कर  विसर राज्य शासनाला पडला आहे. 

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासकीय  हमीभाव केंद्रावर विदर्भ को. आॅपरेटिव्ह फेडरेशन यासाठी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी लागणारे पीक पेरा, सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक, अशी कागदपत्रे एकत्र करुन नोंदणी केली होती. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला होता. अनेक दिवसाची वाट पाहिल्यानंतर मानवत आणि पाथरी तालुक्यातील तूर खरेदीसाठी ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर करुन ९ फेब्रुवारी २०१८  ला हमीभाव केंद्रावर विदर्भ फेडरेशन ने  तूर खरेदीला सुरवात केली  होती . तालुक्यातील ३१५० शेतकऱ्यांनी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. शेतकऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करुन तूर घेऊन येण्याच्या सूचना केल्या जात होत्या. टप्याटप्याने खरेदी विक्री संघाकडून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना संदेश पाठवून तूर विक्रीसाठी आणण्याचे अवाहन केले होते. ६ एप्रिल अखेर ४५७ शेतकऱ्यांची एकूण ६ हजार ७८१ क्विंटल तूर विदर्भ फेडरेशनने खरेदी केली होती. त्यानंतर खरेदीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी ३९४  शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. अशी एकूण नोंदणी केलेल्या ८४४  शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २२०० शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शिल्लक राहीलेली होती. दरम्यान,  तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी उशिरा आॅनलाईन नोंदणी केल्यामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या ३ हजारांवर  गेली होती. त्यावेळी  बाजार पेठेत ४३०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. तर हमीभाव केंद्रावर ५ हजार ४५० भाव आहे. आर्थिक फायदा होत असल्यामुळे शेतकरी हमी भाव केंद्रावर तूर विक्री करण्यावर ठाम होते. मात्र उर्वरीत २१९७ शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी झालीच नाही. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार अनुदान जाहीर केले होते. मात्र ८  महिन्यांचा कालावधी उटून गेल्यानंतरही जाहीर केलेले अनुदान देण्यासाठी राज्य सरकार उदासीन असल्याचे चित्र आहे. 

१० हजार रुपयांपर्यंत मिळणार अनुदान

ज्या शेतकऱ्यांची तूर, हरभरा विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी झालेली होती; परंतु, मुदतीत खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर ही खरेदी होवू शकली नाही. अशा शेतकऱ्यांना १० क्विंटल प्रती हेक्टरी मर्यादित प्रती क्विंटल १ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून ५ मे २०१८ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठक  करण्यात आली होती. या संदर्भातही संथगतीने यंत्रणा काम करत आहे. या अनुदानाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यावर्षी पाउस न बरसल्याने पीक आले नाही. त्यातच अनुदान मिळेना, अशी दुहेरी अडचण शेतकऱ्यांची झाली आहे. शासकीय हमीभाव केंद्रावर विकलेल्या मालाची हक्काची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे बळीराजाची सध्याची विवंचना पाहता ही हक्काची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :fundsनिधीparabhaniपरभणीFarmerशेतकरी