देऊळगाव दुधाटे येथील निसर्गप्रेमी असलेले गोविंदराव दुधाटे यांची मुलगी मनिषा व सुकी येथील परमेश्वर काळबांडे यांचा १० ऑगस्ट रोजी पालंम येथे विवाह झाला. या विवाहास जिल्ह्यातील प्रगतशिक शेतकरी ,कृषीतज्ञ तसेच लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती. दुपारी लग्न विधी व जेवणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लग्नासाठी आलेल्या प्रत्येकाला आहेर देण्यात आले. विशेषतः हा आहेर कापड अथवा वस्तूचा नव्हता. तर तो होता वृक्ष रोपट्याचा. लग्नास आलेल्या प्रत्येकानं वेगवेगळ्या जातींचे रोपटे देण्यात आली. केवळ रोपटे न देता हे रोपटं जगवण्याबाबत विनवणी ही करण्यात आली. या प्रसंगी हवामान तज्ञ पंजाबराव डख, कांतराव देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ. दिलीप श्रृगारपुतळे, प्रगतशील शेतकरी अमृतराज कदम,प्रताप काळे आदींनी हजेरी लावली.
मुलीच्या लग्नात २ हजार वृक्ष रोपट्याचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST