शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीत महसूल विभागाने जप्त केलेल्या २००० ब्रास वाळूची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 20:03 IST

नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केलेल्या वाळू साठ्याची महसूल प्रशासनाने जप्ती करून कारवाई केली़ मात्र जप्त केलेल्या २२ वाळू साठ्यातील तब्बल २ हजार ब्रास वाळू चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे़

ठळक मुद्देजप्त केलेल्या २२ वाळू साठ्यातील तब्बल २ हजार ब्रास वाळू चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे़. या प्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस पाटील यांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहेत़त्याचबरोबर वाळू साठे करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़ 

पाथरी : नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केलेल्या वाळू साठ्याची महसूल प्रशासनाने जप्ती करून कारवाई केली़ मात्र जप्त केलेल्या २२ वाळू साठ्यातील तब्बल २ हजार ब्रास वाळू चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे़. या प्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस पाटील यांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहेत़ त्याचबरोबर वाळू साठे करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़ 

पाथरी तालुका गतवर्षी अवैध वाळू साठ्याने चांगलाच गाजला होता़ ठेकेदार, पोट ठेकेदार यांनी गोदावरी नदीच्या पात्रालगत, शेतात अवैधरीत्या हजारो ब्रास वाळूचे साठे करून ठेवले होते़ वाळू घाटांच्या लिलावाची वेळ निघून गेल्यानंतर हेच वाळू साठे चढ्या भावाने विक्री करण्याचा धंदा या व्यावसायिकांनी सुरू केला होता़ जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळूसाठे असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांना मिळताच त्यांनी तहसीलदारांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची सूचना दिली होती़ पाथरी तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी मंडळ अधिकार्‍यांनी २२ ठिकाणचे अवैध वाळूसाठे जप्त करण्याची कारवाई केली होती़ त्यानंतर ते संबंधित गावच्या पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आले होते़ त्यानंतर याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल महसूल प्रशासनाला सादर करण्यात आला होता़ जप्त करण्यात आलेल्या २२ वाळू साठ्यांमध्ये साडेचार हजार ब्रास वाळू होती़ मात्र जप्त वाळू साठ्यांचा लिलाव होण्यापूर्वीच त्यातील २ हजार ब्रास वाळू चोरी गेलीस़ ही बाब जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या लक्षात आली़ त्यांनी याबाबत कारवाईचे आदेश काढले़ यामध्ये मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलीस पाटलांना नोटिसाही बजावल्या आहेत़ त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे़ 

असे आहेत वाळू साठेजप्त करण्यात आलेल्या २२ वाळूसाठ्यांमध्ये हादगाव कृषी उत्पन्न बाजार समिती गट क्रमांक २१३ मध्ये ९०० ब्रास वाळू साठा   होता़ त्यापैकी ४२८ ब्रास वाळू चोरीस गेली आहे़ तसेच हादगाव येथील गट क्रमांक ३३६, २७७ मध्ये १५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती़ या संपूर्ण वाळुची चोरी झाली आहे़ मरडसगाव येथे गट क्रमांक १३१, १३६ व १३८ या तीन ठिकाणी ३५० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला होता़ त्यातील सर्व वाळू चोरीस गेली आहे़ वरखेड येथील गट क्रमांक १२३ मध्ये ३५० ब्रास वाळू साठा जप्त झाला होता़ या ठिकाणीही संपूर्ण वाळू साठा चोरीस गेला आहे़ मसला येथे ८० ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती़ त्यातील २०  ब्रास वाळू चोरीस गेली आहे़ लिंबा येथील गट क्रमांक १६५ मध्ये ७० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला होता़ या साठ्यातील सर्वच वाळू गायब झाली आहे़ डाकुपिंप्री येथील महसूल विभागाने जिल्हा प्रशासन दरबारी ८० ब्रास वाळू जप्त केल्याचे दाखविण्यात आले़ मात्र त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या वाळूची तपासणी केली असता, १८८ ब्रास वाळू असल्याचे निदर्शनास आले़ ही सर्व वाळू चोरीस गेली आहे़ तारुगव्हाण येथे दोन ठिकाणी अडीच हजार ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती़ त्यापैकी ४०० ब्रास वाळुची चोरी झाली असल्याचा अहवाल महसूल प्रशासनाने तयार केला आहे़ 

गुन्हा दाखल करण्याचे आदेशतालुक्यातील हादगाव आणि बाभळगाव मंडळा अंतर्गत मरडसगाव, वरखेड, मसला, लिंबा, डाकूपिंप्री, हादगाव व तारुगव्हाण या ठिकाणी २२ वाळू साठे जप्त करण्यात आले होते़ मात्र जप्त वाळू साठे कमी झाले आहेत तर काही ठिकाणचे पूर्णत: चोरी झाले आहेत़ सदरचे वाळू साठे अवैध असल्याचे स्पष्ट झाले आहे़ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अवैध वाळू उपसा वाहतूक करण्याच्या नावाखाली वाळूसाठाधारक यांच्या सातबारावर बोजा चढवून गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ 

जबाबदारी निश्चितीच्या नोटिसाअवैध वाळू साठे जप्त करण्यात आल्यानंतर हे साठे सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी मंडळ अधिकारी, संबंधित गावचे तलाठी आणि पोलीस पाटील यांच्यावर आहे़ १२ मार्च २०१३ या शासन निर्णयाप्रमाणे नियम १४  नुसार अवैध वाळू उत्खनन, वाहतूक ज्या महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्रात उघडकीस येईल त्या अधिकार्‍यांवर जबाबदारी आणि शिस्तभंगाची कार्यवाहीची तरतूद आहे़ त्या प्रमाणे २२ वाळू साठ्यांत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा काढण्यात आल्या़ 

नियमानुसार कारवाईतालुक्यातील जप्त वाळूसाठे सांभाळण्याची जबाबदारी असणार्‍या मंडळ अधिकारी, तलाठी यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जात आहे़ -सी़एस़ कोकणी, उपजिल्हाधिकारी, पाथरी 

टॅग्स :theftचोरीparabhaniपरभणी