शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

परभणी जिल्ह्यात पोषण आहाराचे २० कोटी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:53 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांसाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मिळालेल्या २१ कोटी ३० लाख २७ हजार ९७७ रुपयांच्या निधीपैकी तब्बल २० कोटी ३ लाख ७१ हजार ९१० रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देगतवर्षीची शिल्लक रक्कम : फक्त १ कोटी २६ लाख रुपयांचाच निधी झाला खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांसाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मिळालेल्या २१ कोटी ३० लाख २७ हजार ९७७ रुपयांच्या निधीपैकी तब्बल २० कोटी ३ लाख ७१ हजार ९१० रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याची बाब समोर आली आहे.शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या अनुदानित, विना अनुदानित व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन शासनाकडून मोफत दिले जाते. परभणी जिल्ह्यात एकूण १ हजार ५९० शाळांमधील २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या विद्यार्थ्यांसाठी शासनाने २१ कोटी ३० लाख २७ हजार ९७७ रुपयांचा निधी जिल्ह्याला दिला होता. त्यामध्ये केंद्र शासनाने १२ कोटी ७० लाख ९५ हजार ९७८ रुपये तर राज्य शासनाने ८ कोटी ५९ लाख ३१ हजार ९९९ रुपये दिले होते. हा निधी इंधन, भाजीपाला, धान्य, स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानधन, व्यवस्थापन व सनियंत्रण आणि भांडे खरेदी तसेच मुख्याध्यापकांचे मानधन आदींसाठी दिला होता. दिलेली रक्कम त्याच आर्थिक वर्षात खर्च होणे अपेक्षित होते; परंतु, प्रशासकीय कामकाजातील लालफितीच्या कारभारामुळे या आर्थिक वर्षात फक्त १ कोटी २६ लाख ५६ हजार ६६७ रुपयांचीच रक्कम खर्च झाली. त्यामध्ये केंद्र शासनाच्या ७६ लाख ३ हजार ४४ रुपयांची तर राज्य शासनाच्या ५० लाख ५३ हजार ६२३ रुपयांच्या रक्कमेचा समावेश आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्या बैठकीत मे अखेरपर्यंतचा झालेल्या खर्चाचा अहवाल शिक्षण विभागाच्या वतीने सादर करण्यात आला. त्यामध्ये ही बाब समोर आली. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शालेय पोषण आहाराची रक्कम कशी काय? शिल्लक राहिली, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.---जिल्ह्यात १५९० शाळांमध्ये अडीच लाख लाभार्थीशालेय पोषण आहार योजना जिल्ह्यातील १५९० शाळांमध्ये लागू असून त्याचा २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांना लाभ होतो. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील २१२ शाळांमधील २८ हजार १०६ विद्यार्थी, जिंतूर तालुक्यातील २८८ शाळांमधील ३५ हजार ८५४ विद्यार्थी, मानवत तालुक्यातील ८५ शाळांमधील ९ हजार ४६५ विद्यार्थी, पालम तालुक्यातील १३८ शाळांमधील १३ हजार ११७ विद्यार्थी, परभणी तालुक्यातील ग्रामीण भागातील १९१ शाळांमधील ३७ हजार ९१२ विद्यार्थी, परभणी महापालिका हद्दीतील १४९ शाळांमधील ५४ हजार ८८९ विद्यार्थी, पाथरी तालुक्यातील १३२ शाळांमधील १८ हजार ९६८ विद्यार्थी, पूर्णा तालुक्यातील १४९ शाळांमधील २३ हजार १५० विद्यार्थी, सेलू तालुक्यातील १४५ शाळांमधील २२ हजार ४४१ विद्यार्थी आणि सोनपेठ तालुक्यातील १०१ शाळांमधील १० हजार ६८७ विद्यार्थी संख्येचा समावेश आहे.---स्वयंपाकी, मदतनीस यांचे १ कोटी ७० लाख पडूनशालेय पोषण आहार योजनेंतर्गत काम करणारे स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्याकरीता केंद्र शासनाने मानधनापोटी २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ५९ लाख ९८ हजार रुपये तर राज्य शासनाने ६४ लाख ४४ हजार १३२ रुपये असे एकूण १ कोटी ७० लाख ३४ हजार २३० रुपयांचे मानधन उपलब्ध करुन दिले; परंतु, २०१७-१८ या वर्षात संबंधितांना वितरित केले गेले नाही. त्यामुळे हा निधीही अखर्चितमध्ये असल्याचे जि.प. शिक्षण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.---मार्च अखेरीस यातील बहुतांश निधी प्राप्त झाला आहे. शालेय पोषण आहाराच्या पुरवठादारांचे तसेच काही शाळांची देयके बाकी आहेत. अन्न आयोगाचे निर्देश आलेले नाहीत. त्यांचे निर्देश आल्यानंतर निधी वितरित केला जाईल. आणखी काही निधी शिल्लक असेल तर तोही काही दिवसातच संबंधितांना दिला जाईल. हा निधी २ वर्षात खर्च करता येतो. त्यामुळे गतवर्षीचा निधी चालू वर्षीही खर्च करण्यात काहीही अडचण नाही.-आशा गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीfoodअन्नSchoolशाळाfundsनिधी