शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षांत १३० अपघात बळी; रखडलेली रस्त्यांची कामे हीच परभणी जिल्ह्याची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:25 IST

मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे.

परभणी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची कामे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत आली की तेथून पुढे रखडतात, असा आजवरचा अनुभव असून, सध्याही जिल्ह्याच्या हद्दीत तीन पैकी दोन राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत. परिणामी वाहनधारकांचा त्रास तर वाढलाच आहे शिवाय अपघातांची संख्याही वाढली आहे.

कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र.६१, परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर आणि जालना- सेलू या राज्य महामार्गाची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. या कामांपैकी परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे काम वेगाने हाती घेतले. हा रस्ता जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय काही प्रमाणात दूर झाली. मात्र इतर महामार्गांची कामे रखडली आहेत. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम पाथरीपर्यंत झाले आहे. या मार्गावरील मानवतरोड ते परभणी इथपर्यंत कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवला अन् काम बंद केले. त्यामुळे दोन वर्षांपासून वाहनधारक त्रस्त होते. आता कुठे या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. याच मार्गादवर जिल्ह्याच्या हद्दीवर झिरोफाटा ते आसोला पाटीपर्यंत काम रखडले आहे. परभणी ते जिंतूर या रस्त्याची स्थितीही अशीच आहे. अनेक भागात कामे अजून पूर्ण झाली नाहीत. मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे.

४ वर्षांत १३० बळीकल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील मानवतरोड ते झिरोफाटा या ४४ कि.मी. अंतराचे काम रखडले आहे. या कामासाठी चार कंत्राटदार बदलण्यात आले. मात्र तरीही काम ठप्प आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रश्नात लक्ष घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवले होते. त्यात मागील चार वर्षांत ४४ कि.मी.च्या या रस्त्यावर १३० अपघाती मृत्यू झाल्याची नोंद घेतली होती. तसेच खराब रस्त्यामुळे अपघात वाढत असल्याचे नमूद करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेडच्या कार्यकारी अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मानवतरोड ते परभणी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र झिरोफाटा भागात काम रखडलेले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग