बनवस येथील गोविंद रामराव सुरनर, मोहन रामराव सुरनर व लक्ष्मण रामराव सुरनर या तिन्ही भावांच्या घरात १३ जुलै रोजी मध्यरात्रीच्या वेळी सर्व जण गाढ झोपेत असताना कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून ८५ तोळे चांदी, ३२ तोळे सोने व रोख रक्कम १ लाख ४२ हजार ५०० रुपये लंपास केले आहेत. पहाटे झोपेतून जागे झाल्यानंतर ही घटना लक्षात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड, पोलीस निरीक्षक दीपक शेळके, उपनिरीक्षक विनोद साने, पोलीस कर्मचारी दीपक केजगीर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले; मात्र श्वान घुटमळला. यावेळी फिंगर प्रिंट पथकास पाचारण करण्यात आले. या पथकानेही तपासणी केली. याप्रकरणी गोविंद रामराव सुरनर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणी जिल्ह्यात ३ घरे फोडून ११ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST