शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे, चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 15:19 IST

कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पदनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- प्रभु पुजारी/ सचिन कांबळे 

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तीमय वातावरणात शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा यंदाचा मान कर्नाटकमधील बळीराम शेवु चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दांपत्याला मिळाला. कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अधिकारी, पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभु, उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे, अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक विठल दबडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, महसूल प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.कार्तिकी यात्रेचा मानाचे वारकऱ्याचा मान बळीराम शेवु चव्हाण (वय ४०) व  शिनाबाई बळीराम चव्हाण (वय ३५, रा.हडगल्ली, ता. जि. विजापूर) यांना मिळाला. यावेळी बळीराम चव्हाण यांनी सांगितले की, मी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात वाहक आहे. गेली ६ वर्षे  पंढरपुरची वारी करतो. मला रविराज व संगीता ही दोन उच्च शिक्षित जुळी मुले आहेत. याचबरोबर, महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळ कर्मचारी बंधूंना चांगल्या पध्दतीने वेतन मिळावे,तसेच त्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी विठ्ठल चरणी साकडे घातले असल्याचेही बळीराम चव्हाण यांनी सांगितले.

तीन लाख भाविककार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून तीन लाख भाविक पंढरपुरात आले आहेत. दर्शनासाठी भाविकांना १८ ते १९ तास लागत आहेत. मंदिर समितीतर्फे ८९ सीसीटीव्ही कॅमे-यातून संपूर्ण वारीवर नजर ठेवून आहेत.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर