शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

तुमचा पासवर्ड वीक आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 17:15 IST

एकदा खात्री करा,  नाहीतर पैसेच नाही, तर तुमचं खासगीपणही चोरीला जाईल!

 - प्रसाद ताम्हनकर

कोरोनाकाळात इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या गुन्ह्यात प्रचंड वाढ झालेली आहे. महत्त्वाची माहिती चोरणं, संगणक लॉक करून त्या बदल्यात खंडणी मागणं असे गुन्हे जगभरात डोकं  वर काढत असतानाच, भारतात मोठय़ा कंपन्यांची महत्त्वाची माहिती चोरणं, खोट्या इ-मेल्स, मेसेजेसच्या माध्यमातून आर्थिक गंडा घालणं अशा गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार अनेक व्यक्तींचे कमकुवत पासवर्ड, हे असले गुन्हे घडायला मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलं आहे. या संशोधनानुसार ऑनलाइन आर्थिक व्यवहार वा इंटरनेटच्या माध्यमातून इतर कार्य करणार्‍या प्रत्येक चौथ्या व्यक्तीचा पासवर्ड हा अत्यंत कमकुवत आणि ओळखण्यास सहजसोपा असा असतो. याच कारणानं हॅकर सहजपणे अशा व्यक्तींना आपलं लक्ष्य बनवतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक करतात वा संवेदनशील माहिती सहजपणे चोरून नेतात. याला कारण वीक पासवर्ड. अनेकजण तिथंच चुकतात.

1. सायबर तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक हे इंटरनेटचा वापर करताना अत्यंत साधा शब्द पासवर्ड म्हणून ठेवतात, तसेच अनेक प्लॅटफॉर्म्सवरती विविध खात्यांना एकच पासवर्ड वापरतात. 2. अनेक लोक आपल्या मुला-मुलीचं नाव, गाडीचा नंबर अथवा आपला मोबाइल नंबर पासवर्ड म्हणून ठेवतात, जो की हॅक करणं हॅकर्सच्या डाव्या हाताचा मळ आहे. 3. इंटरनेटचा वापर करणार्‍यांपैकी 32 टक्के लोक म्हणजे प्रत्येक तीनपैकी एक व्यक्ती आपले पासवर्ड्स हे ब्राउझरमध्येच सेव्ह ठेवते. असे पासवर्ड्स हॅकर्स सहजपणे हॅक करू शकतात. 4. एक सामान्य व्यक्ती इंटरनेटवर जवळपास 27 वेगवेगळे खाते वापरते, असादेखील निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. 5. या विविध खात्यांमध्ये ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडिया अकाउण्ट्सपासून ते त्याच्या बँक खात्यापर्यंतचादेखील समावेश असतो. 6. अनेक इंटरनेट वापरकर्ते, हे आपले पासवर्ड्स ई-मेलमध्ये, नोटपॅडमध्ये किंवा मोबाइलमध्ये नोंद करून ठेवतात, जे अत्यंत घातक आहे. 7. अनेक लोक वर्षानुवर्षे आपला पासवर्ड न बदलता जुनाच पासवर्ड वापरत असतात. 8. पासवर्ड कसा हवा? तर लांबलचक पासवर्ड शक्यतो निवडावा. पासवर्डमध्ये एक वा दोन अक्षरं कॅपिटल असावीत आणि पासवर्ड शक्यतो अक्षरं आणि आकडे यांचा मेळ घालून बनवलेला असावा. आपली जन्मतारीख, नावं, मोबाइल वा गाडी नंबर त्यात नको.

(लेखक विज्ञान/तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहे.)

prasad.tamhankar@gmail.com