शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

येडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 12:14 PM

एकदम चुपचाप बसणारी, नाकावर बसल्या माशीला सुद्धा घाबरत घाबरत उठ गं बाई म्हणणारी राखी सावंत एकदम बोल्ड आणि मुहफट झाली. जिथं तोंड उघडताना मारामार; तिथं जाळ आला माझ्या जिभेवर तो का..? कारण अठरा वर्षांची होताच मी घरातून पळाले.

- राखी सावंतपळाला..स्टार झाला. तमुक पळाला स्टार झाला.असं पळून माणसं स्टार झाली असती तर आपला सगळा बधिर समाज पळत नसता सुटला. (पण मरो ते, मला त्याच्याशी काय करायचं..)मी पळाले घरातून. पळण्याशिवाय पर्यायच नव्हता, किती दिवस बापाच्या हातचा मार खायचा. ती तसली ‘नास्की-कुस्की-सडकी’ जिंदगी लाथाडायचीच होती मला. पळाले. पळताना घरातूनच थोडे पैसेही घेतले होते. झुठ कशाला बोला, राखी सावंत तसंही कधी झुठ बोलत नाही, जे केलं त्याचा कधीच पस्तावा करत नाही, लपवत नाही. डंके की चोट पर जिंदगी जिने का हौसला है, म्हणून तर राखी राखी सावंत आहे आज..!तर पळाले. मैत्रिणीच्या घरी राहिले. मग चार-दोन ठिकाणी पीजी राहिले. तिकडे माझा पोलीस बाप आणि त्याची माणसं कुत्र्यासारखी मला हुडकत फिरत होती. पोरगी घरातून पळाली म्हणजे इज्जतच गेली ना, तोंडाला काळं फासलं पोरीनं. समाजात नाक कापलं.घरातून पळाल्यावर पहिल्यांदा कळली पोटाची भूक.मुंबईत वडापाव खाल्ला तर ती भागते, पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा..?मला तर नाचण्यापलीकडे काहीच येत नव्हतं.अ‍ॅक्टिंगबिक्टिंग कशाशी खातात हेच माहिती नव्हतं. त्याकाळी दूरदर्शनवर एक रंगारंग नावाचा कार्यक्रम असायचा. त्यात मला पहिलं काम मिळालं. स्टुडिओत गेले तर त्यांनी नाचायला सांगायचं सोडून माझ्या हातात एक कागद दिला. म्हणे, हे डायलॉग वाच.. म्हण.. अ‍ॅक्टिंग कर.मला तर वाचताही येत नव्हतं. अ‍ॅक्टिंग कशाशी खाणार..?तेव्हा मला कळलं, आपल्याला तर काहीच येत नाही. या फिल्म इंडस्ट्रीत माझ्यासारखीला कोण उभं करणार होतं..? मी अशी पोरगी होते जी दिसायला सुंदर नाही, अ‍ॅक्टिंगफिक्टिंग काय येत नाही, मागं-पुढं-डोक्यावर कुणी गॉडफादर नाही, त्याचा हात-पाय काहीच नाही.तिथून सुरुवात झाली सांगा; पण राखी डरली नाही. एक-दोन मैत्रिणी स्टेज म्हणजे नाटकं करायच्या. मी त्यांच्याबरोबर जाऊ लागले. बॅकस्टेज काम करू लागले. मराठी-हिंंदी-गुजराथी मिळेल त्या नाटकात स्टेज-बॅकस्टेज केलं. तिथं कळलं अ‍ॅक्टिंग काय असतं, अभिनय कशाला म्हणतात. राखी सावंतने कधीकाळी जीव तोडून स्टेज केलंय हे कुणाला माहिती आहे आज..?पण मी करायची, एकतर मला पहिल्यांदाच एक नवीन जग कळत होतं आणि दुसरं म्हणजे पैसे. दिवसाला पाचशे रुपये मिळायचे. ते पैसे आणि जगाचा अनुभव यानं राखी सावंतच बदलून गेली.एकदम चुपचाप बसणारी, नाकावर बसल्या माशीला सुद्धा घाबरत घाबरत उठ गं बाई म्हणणारी राखी सावंत एकदम बोल्ड आणि मुहफट झाली. जिथं तोंड उघडायचं नाही तिथं जाळ आला माझ्या जिभेवर तो का..?समाजानं तिला तसं जगायला भाग पाडलं म्हणून!मुळात राखी सावंत ‘येडी’ आहे..आणि ती ‘येडी’ राहिलेलीच बरी..(लोकमत दीपोत्सव-२०१२ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संपादित अंश !)

 

टॅग्स :Rakhi Sawantराखी सावंत